शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

Telangana Rape Case: ''संसद जसा पाहिजे तसा कायदा बनवण्यासाठी तयार''

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 15:54 IST

तेलंगणा सामूहिक बलात्कार प्रकरणावर राज्यसभेनंतर आता लोकसभेत चर्चा होऊन निषेध नोंदवण्यात आला आहे.

नवी दिल्लीः तेलंगणा सामूहिक बलात्कार प्रकरणावर राज्यसभेनंतर आता लोकसभेत चर्चा होऊन निषेध नोंदवण्यात आला आहे. संसद जसा पाहिजे, तशा कायद्यावर सहमती बनवू शकते, तसेच तो कायदा तयारही केला जाऊ शकतो, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. जेव्हा गरज असेल तेव्हा या प्रकरणात चर्चा करण्यात येईल. त्यासाठी कायदा बदलण्याची गरज नाही. तर या प्रकरणातील आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, संसदेला आवश्यक वाटल्यास तसा कठोर कायदाही बनवण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. लोकसभेत चर्चेदरम्यान अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांनी सांगितलं की, हैदराबादमधल्या घटनेत पोलिसांत गुन्हा नोंद करताना त्या पीडितेच्या कुटुंबीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही चौकशी समिती नेमायला तीन दिवस लागले. जेव्हा केव्हा अशी घटना घडते, तेव्हा आपण सदनात चर्चा करतो. अशा घटनेचा निषेध नोंदवून कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी करतो. परंतु अशा काही घटना रोखण्यासाठी राज्य सरकारला सातत्यानं अपयश येत आहे. डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची अतिशय निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे. हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तरुणीला जाळून मारण्यात आल्याची घटना घडली. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. राज्यसभेतही या प्रकरणात चर्चा झालेली आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर भाष्य करत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात ठार करा असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे. तसेच हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर सरकारने ठोस उत्तर द्यावं असंही म्हटलं. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 'अनेक कायदे तयार केले आहेत. मात्र अनेकदा कायदे तयार करून समस्या सोडवल्या जात नाहीत. ही समस्या मूळापासून नष्ट करण्यासाठी सर्व समाजाने एकत्रित येणं गरजेचं आहे' असं देखील गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह