शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 06:12 IST

तेजस्वी यांनी आपल्याकडे दोन व्होटर आयडी असल्याचा दावा केला होता. त्यावर आता आयोगाने नोटीस जारी केल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसते...

 

एस. पी. सिन्हा -

पाटणा : आपल्याकडे दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांतील व्होटर कार्ड असल्याचा व त्यापैकी एकाचे रेकॉर्ड मिळत नसल्याचा अलीकडेच दावा करणारे बिहारचे विरोधी पक्षनेते व राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस जारी करून ईपीआयसी क्रमांक आरएबी २९१६१२० चा तपशील मागितला आहे.

 तेजस्वी यांनी म्हटले होते की, त्यांचे नाव एका मतदार यादीत आढळले नाही. त्यावर आयोगाने म्हटले आहे की, तुम्ही ज्या क्रमांकाचा उल्लेख करीत आहात, त्याची माहिती द्यावी. तुमचे नाव मतदान केंद्र २०४ च्या ४१६ पानावर आहे. त्याचा ईपीआयसी क्रमांक आरएबी ०४५६२२८ आहे. परंतु तुम्ही पत्रपरिषदेत दावा केला आहे की, तुम्ही ईपीआयसी क्रमांक आरएबी २९१६१२० शोधला आहे. असा कोणताही ईपीआयसी क्रमांक आयोगाने जारी केलेला नाही. त्यामुळे या मतदार ओळखपत्राचे संपूर्ण विवरण द्यावे. त्या आधारे त्याची तपासणी करता येईल.

तेजस्वी यांनी आपल्याकडे दोन व्होटर आयडी असल्याचा दावा केला होता. त्यावर आता आयोगाने नोटीस जारी केल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसते. बिहार यादीवर कोणाचीही तक्रार नाही : आयोगनवी दिल्ली : बिहारमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने १ ऑगस्टला प्रकाशित मतदार यादीमध्ये नाव सामील करण्याबाबत किंवा हटवण्याबाबत संपर्क साधलेला नाही, असे निवडणूक आयोगाने रविवारी म्हटले. १ ऑगस्टच्या दुपारी तीनपासून ३ ऑगस्टच्या दुपारी तीनपर्यंत दावे किंवा आक्षेपबाबत कुणीही संपर्क साधलेला नाही. तथापि, व्यक्तिगत रूपात मतदारांकडून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा अपात्र लोकांची नावे हटवण्यासाठी ९४१ दावे व आक्षेप प्राप्त झाले आहेत. राजकीय पक्ष व मतदारांकडे दावे, आक्षेप सादर करण्यास १ सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे.

बिहारमध्ये ६५ लाख मतदार मतदानापासून वंचित होण्याचा धोका वाढला आहे. दुसरीकडे तामिळनाडूत ६.५ लाख लोकांचा मतदार यादीत समावेश करण्यासंदर्भात समोर आलेली माहिती चिंताजनक व बेकायदेशीर आहे.पी. चिदंबरम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

निवडणूक आयोगाचा प्रामाणिकपणा संशयास्पद आहे. त्यामुळे मतदार याद्यांच्या संशोधनावर विरोधी पक्षांच्या खासदारांना संसदेत चर्चा हवी आहे.  सरकार काहीतरी लपवू पाहत आहे. ते नेमके काय आहे?गौरव गोगोई, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

टॅग्स :BiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादव