शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

तेजस, शताब्दीमधील मनोरंजन होणार बंद, प्रवाशांनी प्रताप केल्याने रेल्वेने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 04:22 IST

तेजस व शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना यापुढे सीटच्या मागे लावलेल्या एलसीडीवर चित्रपट किंवा व्हिडीओज बघता येणार नाहीत ना गाणी ऐकायला मिळतील.

नवी दिल्ली : तेजस व शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना यापुढे सीटच्या मागे लावलेल्या एलसीडीवर चित्रपट किंवा व्हिडीओज बघता येणार नाहीत ना गाणी ऐकायला मिळतील. याचे मुख्य कारणही प्रवासीच आहेत. प्रवाशांनी या उपकरणांची नासधूस केल्यामुळे रेल्वेने या दोन्ही रेल्वेच्या सगळ््या डब्यांतून एलसीडी काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसच्या डब्यांमध्येही एलसीडी स्क्रीन्स होते. या स्क्रीन्सची नासधूस झाल्याचे, वायर तुटल्याचे व हेडफोन्स चोरीला गेल्याचे आढळले होते. प्रवासात करमणुकीची ही सेवा रद्द करण्याची ही कारणे असल्याचे रेल्वेने सांगितले. रेल्वे बोर्डाने फेब्रुवारीमध्ये सर्व विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशांनुसार स्क्रीन्स काढून घेण्यास सुरुवात झाली आहे.मुंबई ते गोवा दरम्यान गेल्या वर्षी मे महिन्यात पहिली तेजस एक्स्प्रेस अतिशय उत्तम दर्जाच्या सुखसोयींसह सुरू झाली. त्यातही करमणुकीच्या या उपकरणांची वारंवार नासधूस होत असल्याचे आढळले.>वाय-फाय सुरू करणारप्रवासी आता स्मार्टफोन्स वापरतात. त्यांच्यासाठी रेल्वेत वाय-फाय सेवा असेल. त्यामुळे करमणुकीची उपकरणे काढून घेतली जातील, असे रेल्वे मंडळाचे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे संचालक वेद प्रकाश यांनी सांगितले.

टॅग्स :Tejas Expressतेजस एक्स्प्रेस