शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
4
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
5
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
6
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
7
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
8
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
9
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
10
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
12
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
13
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
14
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
15
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
16
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
17
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

'ब्लू व्हेल' गेमवर बंदी तांत्रिकदृष्ट्या अशक्य, इंटरनेट तज्ज्ञांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2017 9:04 AM

मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल चॅलेंज या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली असली, तरी अशी बंदी करणं अशक्य असल्याचं मत मत इंटरनेट तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे

ठळक मुद्देमुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल चॅलेंज या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली असली, तरी अशी बंदी करणं अशक्य असल्याचं मत मत इंटरनेट तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे . विधानसभा आणि संसदेतही या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली गेली. तसंच संकेतस्थळावरून तो गेम काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होतीबंदी घालणं शक्य नाही, असं ‘सेंटर ऑफ इंटरनेट अँड सोसायटी’ या संस्थेचे उद्भव तिवारी यांनी सांगितलं आहे.

नवी दिल्ली, दि. 7- मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल चॅलेंज या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली असली, तरी अशी बंदी करणं अशक्य असल्याचं मत मत इंटरनेट तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. विधानसभा आणि संसदेतही या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली गेली. तसंच संकेतस्थळावरून तो गेम काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. पण हा गेम मोबाइल किंवा संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतो, त्यामुळे त्यावर बंदी घालणं शक्य नाही, असं ‘सेंटर ऑफ इंटरनेट अँड सोसायटी’ या संस्थेचे उद्भव तिवारी यांनी सांगितलं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. 

या गेमसाठी कुठलं एक विशिष्ठ संकेतस्थळ नाही. त्यामुळे सगळ्या इंटरनेटवरच बंदी घातली तर हा गेम रोखता येईल, पण ते अशक्य आहे. या गेमचा प्लेस्टोअरवर किंवा संकेतस्थळांवर शोध घेतला तर तो सापडत नाही, त्यासाठी त्याचे निर्माते संभाव्य वापरकर्त्यांशी संपर्क साधतात. सध्या ब्लू व्हेल गेमला पर्याय म्हणून आणखी एक गेम तयार करण्यात आला आहे. यामध्ये ब्लू व्हेल मासा सगळे अडथळे पार करत पुढे जातो. या नव्या गेमध्ये मुलांना विविध टास्क करायला सांगतात. जसं की, व्यायाम करा, पुश अप्स करा. या खेळाच्या सगळ्या स्टेज पूर्ण झाल्यावर तुमचं जीवन अमूल्य आहे, असा संदेशही देण्यात येतो. या गेमची लिंक सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली. 

पण सगळ्यासांठी घातक असलेला ब्लू व्हेल गेम ५० दिवसांच्या आव्हानांचा असून तो रशियात तयार झाला. या खेळामुळे रशियात १३० जणांचा बळी गेला आहे. मुंबईच्या मनप्रीत सहानी याने ३० जुलैला सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. तो ब्लू व्हेलचा भारतातील पहिला बळी होता. या गेमचे प्रशासक हे विविध ऑनलाइन पोर्टल वापरून मुलांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचतात. त्यात इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप तसंच इतर ऑनलाइन पोर्टलचा समावेश असल्याचं,तिवारी यांनी सांगितलं.

इन्स्टाग्राम आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सने आता ब्लू व्हेल गेम विरोधात उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये युजरला जर या गेमचा हॅशटॅग आला तर युजरला लगेचच हेल्प पेजकडे नेले जाईल, त्यात टॉक टू अ फ्रेंड, काँटॅक्ट हेल्पलाइन आणि गेट टिप्स अँड सपोर्ट हे पर्याय दिले आहेत. त्यातून या गेममधून निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यातून आपण बाहेर पडतो. या शिवाय पालकांनी मुलं इंटरनेटवर काय सर्च करतात, यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असंही मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

रशियाचा बावीस वर्षीय तरुण फिलीप बुडेकिन याने या गेमची निर्मिती केली आहे. त्याला गेल्या नोव्हेंबरमध्ये अटक झाली. ज्या लोकांची जगण्याची लायकी नाही, त्यांना जगातून घालवण्याचा हेतू या चॅलेंज गेममध्ये आहे, असं त्याने त्यावेळी सांगितलं होतं.