नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर शुक्रवारी सकाळी एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) प्रणालीत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमानसेवा विस्कळीत झाली. या अचानक आलेल्या समस्येमुळे अनेक विमानांना ३० मिनिटांहून अधिक काळ विलंब झाला, ज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
शुक्रवारी सकाळी एटीसी यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने विमानांचे आगमन आणि प्रस्थान दोन्ही थांबले. यामुळे धावपट्टीवर अनेक विमानांना उड्डाणासाठी आणि उतरण्यासाठी ताटकळत राहावे लागले.
एअर इंडियाच्या एका विमानातील प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे विमान अर्ध्या तासाहून अधिक काळ धावपट्टीवर उड्डाणाच्या प्रतीक्षेत होते. क्रू मेंबर्सनी या विलंबाचे कारण एटीसी सिस्टीममधील तांत्रिक अडचण असल्याचे स्पष्ट केले. या विमानांवरील प्रवाशांना त्यांच्या संबंधित एअरलाईन्सनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे. तांत्रिक टीमने त्वरित कार्यवाही सुरू केली असून, लवकरच विमानसेवा पूर्ववत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
प्रवाशांची वाढती गर्दीया बिघाडामुळे बोर्डिंग गेट्सवर प्रवाशांची गर्दी वाढली. विमानतळावर वारंवार होत असलेल्या तांत्रिक समस्यांमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र, या संदर्भात एअरलाईन्स किंवा विमानतळ प्राधिकरणाकडून अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट देण्यात आलेले नाही.
Web Summary : A technical glitch in Delhi's ATC system disrupted flight operations Friday morning. Numerous flights faced delays of over 30 minutes, causing passenger inconvenience. Both arrivals and departures were halted, leading to congestion and passenger frustration. Technical teams are working to restore normalcy.
Web Summary : दिल्ली एयरपोर्ट के एटीसी सिस्टम में तकनीकी खराबी से शुक्रवार सुबह उड़ान संचालन बाधित हुआ। कई उड़ानें 30 मिनट से अधिक देरी से चलीं, जिससे यात्रियों को परेशानी हुई। आगमन और प्रस्थान दोनों रुके रहे, जिससे भीड़ और यात्रियों में निराशा हुई। तकनीकी टीमें सामान्य स्थिति बहाल करने में जुटी हैं।