नवी दिल्ली : प्रेमाचा मंत्र देणा:या ‘किस ऑफ लव्ह’चे लोण शनिवारी दिल्लीत पोहोचले आहे. एका प्रेमीयुगुलासोबत झालेल्या गैरवर्तणुकीचा निषेध करण्यासाठी फेसबुक आणि अन्य सोशल साईटवर देण्यात आलेल्या हाकेला ओ देत तरुणाई रस्त्यावर आली. याआधी लव्ह जिहादविरुद्ध नारा देणा:या रा.स्व. संघाच्या केशवकुंज कार्यालयावर तरुणांनी धडक देत धरणो आंदोलन पुकारताच दिल्लीतील हवा तापायला सुरुवात झाली.
पाहता पाहता पोलिसांनी केशवकुंजसमोर तगडा बंदोबस्त लावला. सोशल साईटवरील आवाहनाला प्रतिसाद देत या आंदोलनात सहभागी होणा:या युवकांची संख्या वाढत आहे. दरम्यान,आंदोलनात जास्तीतजास्त संख्येने युवक-युवतींनी सहभागी व्हावे यासाठी सोशल नेटवर्किग साईटवर खास निमंत्रण पेज बनविण्यात आले आहे.
याआधी केरळमधील कोची आणि पश्चिम बंगालमधील कोलकात्यात ‘किस ऑफ लव्ह’ आंदोलनाला कमी प्रतिसाद मिळाला असला तरी राजधानी दिल्लीतील या आंदोलनाला व्यापक प्रसिद्धी मिळाली आहे. फेसबुकवरील
666.ाूंीु‘.ूे/ ी5ील्ल32/ 306392516238539
या पेजवर आंदोलनाची माहिती देण्यात आली असून शनिवारी सायंकाळी 4 वाजता झंडेवाला मेट्रो स्थानकाजवळील संघ कार्यालयाबाहेर किस ऑफ लव्ह या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सुमारे नऊ हजार तरुण-तरुणींनी या आंदोलनाचे निमंत्रण पाठविण्यात आले. 11क्क् युजर्सनी लाईक देत आंदोलनात सहभागाची इच्छा दर्शवली. ‘संघी गुंडे होशियार, तेरे सामने करेंगे प्यार’ ही टॅगलाईनही गाजू लागली आहे. दाक्षिणात्य विरोधक आणि संघाच्या कार्यकत्र्यानी तरुणाईला रोखून दाखवावे या शब्दांत आयोजकांनी आव्हान दिले.
आयआयटीच्या विद्याथ्र्याचा सहभाग
मुंबईतील आयआयटीचे विद्यार्थी आयआयटी फॅकल्टी कॅम्पसच्या आवारात गोळा होणार असून आंदोलनाला पाठिंबा जाहीर करणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अशी माहिती फेसबुकच्या माध्यमातून मिळाली आहे.
हात मिळवा, आलिंगन द्या..
4या हात मिळवा, एकमेकांना आलिंगन द्या आणि चुंबन घ्या, असे आवाहनही या पेजवर करण्यात आले आहे. आमचे कॅफे, पब, पार्क हिसकावून घेण्यात आले. चुंबन घेण्यास एकही जागा शिल्लक ठेवलेली नाही. रा.स्व. संघाच्या भूमिकेचा कडाडून विरोध करण्यासाठीच आम्ही आंदोलन करीत आहोत.
4केरळच्या कोङिाकोडे शहरातील एका कॅफेमध्ये तरुण-तरुणी डेटिंगसाठी येत असल्याच्या कारणावरून एका हिंदू संघटनेच्या कार्यकत्र्यानी नासधूस केल्यानंतर या आंदोलनाद्वारे निषेध नोंदविण्यात आला. महाराष्ट्रातील एका दलित तरुणाचे उच्चवर्णीय तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून त्या युवतीच्या नातेवाइकांनी दोघांची निर्घृण हत्या केल्याची दखलही या आंदोलनात घेण्यात आली.
संस्कृतीच्या कथित संरक्षणाच्या नावावर सुरू असलेल्या पोलीसगिरीच्या विरोधातील मोहिमेच्या (किस ऑफ लव्ह) कार्यकत्र्याची (उजवीकडे) शनिवारी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाबाहेर हिंदुत्ववादी कार्यकत्र्याशी वादावादी झाली.