शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

टीम मोदी ठरली, गडकरी, राजनाथ सिंहांचा समावेश निश्चित

By admin | Updated: May 25, 2014 20:31 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिरवा कंदील दाखवल्यावर भाजपने मोदींची टीम तयार केली असून लवकरच याविषयी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, दि. २५ -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिरवा कंदील दिल्यावर नरेंद्र मोदींचे मंत्रिमंडळ निश्चित झाले असून टीम मोदीमध्ये नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, गोपीनाथ मुंडे, वैंकेय्या नायडू यांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र याविषयी भाजपने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसून रविवारी रात्री राष्ट्रपतींकडे मंत्रिमंडळाची यादी सोपवण्यात येणार असून यानंतर नेमके चित्र स्पष्ट होईल.  

भरघोस मताधिक्य मिळवत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. १६ मेरोजी लोकसभेचा निकाल लागला असला तरी गेल्या दहा दिवसांपासून भाजपात मोदींच्या मंत्रिमंडळाव विचारमंथन सुरु होते. सोमवारी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याने त्याच दिवशी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही शपथ घेणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या निश्चितीसाठी भाजप व एनडीएतील मित्रपक्षांमध्ये भेटीगाठीचा सिलसिला सुरु होता. रविवारी सकाळीही मित्रपक्षाच्या नेत्यांनी तसेच भाजपमधील इच्छुकांनी मोदींची गुजरात भवनमध्ये भेट घेतली.
शपथविधीला चोवीस तासांहून कमी अवधी शिल्लक असतानाच भाजपने टीम मोदीची निवड केली आहे. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी संघनेत्यांची भेट घेत संघप्रमुखांना ही यादी दाखवली असून संघाने या यादीला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे मोदींचे मंत्रिमंडळ निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  भाजपकडून सोमवारी शपथविधी सोहळ्यापूर्वी अधिकृतरित्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहे.
यांचा समावेश निश्चित
राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अरुण जेटली, वैंकेय्या नायडू, रविशंकर प्रसाद, गोपीनाथ मुंडे, रामविलास पासवान, सुषमा स्वराज, व्ही. के.सिंग, हर्षवर्धन, उमा भारती, बंगारु दत्तात्रय, राजीवप्रसाद रुडी यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश निश्चित असल्याचे वृत्त आहे. मात्र यापैकी कोणाला कोणत्या खात्याचा कार्यभार दिला जातो हे अद्याप समजू शकलेले नाही. 
लोकसभा अध्यक्षपदाचे दावेदार 
सुमित्रा महाजन, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी, कारिया मुंडा या नेत्यांची नावे लोकसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.