टीम इंडिया टिष्ट्वटर
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST
टीम इंडियाचे टिष्ट्वटरवर
टीम इंडिया टिष्ट्वटर
टीम इंडियाचे टिष्ट्वटरवर सर्वाधिक फॉलोअर्सनवी दिल्ली : गत चॅम्पियन टीम इंडिया सोशल नेटवर्किंग मीडिया टिष्ट्वटरवर सर्वाधिक फॉलोअर्सबाबत अव्वल स्थानावर आहे. भारताच्या सर्व खेळाडूंचे एकूण एक कोटी ५७ लाख फॉलोअर्स आहेत.कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या आठही देशांच्या फॉलोअर्समध्ये भारतापाठोपाठ द.आफ्रिकेचे ५७ लाख आणि ऑस्ट्रेलियाचे ३६ लाख फॉलोअर्स आहेत. लंकेचे पाच लाख ५० हजार फॉलोअर्स असून, हा संघ अखेरच्या स्थानावर आहे.वैयक्तिक खेळाडूंमध्ये आठ खेळाडू असे आहेत की ज्यांचे फॉलोअर्स दहा लाखांहून अधिक आहेत. त्यात विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आणि रोहित शर्मा या चार भारतीयांचादेखील समावेश आहे. याशिवाय ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, डेल स्टेन आणि मायकेल क्लार्क यांच्या नावांचा क्रम लागतो. विश्वचषकासाठी जाहीर झालेल्या द.आफ्रिकेच्या १५ पैकी १२ खेळाडू टिष्ट्वटरवर सक्रिय आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे प्रत्येकी ११ खेळाडू यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. भारत आणि न्यूझिलंडचे प्रत्येकी आठ खेळाडू टिष्ट्वटरवर सक्रिय असून तिसऱ्या स्थानावर आहेत.(वृत्तसंस्था)