शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

लंका'दहन' केल्यानंतर विराट ब्रिगेडने कॅन्डीत फडकावला झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 12:40 IST

कसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर श्रीलंकेत ध्वजारोहण केलं. कॅंडीमध्ये देशाचा झेंडा फडकावून संघातील सदस्यांनी राष्ट्रगीत गायलं.

ठळक मुद्देकसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर श्रीलंकेत ध्वजारोहण केलं. कॅंडीमध्ये देशाचा झेंडा फडकावून संघातील सदस्यांनी राष्ट्रगीत गायलं. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होते.

कॅन्डी, दि. 15 - कसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर श्रीलंकेत ध्वजारोहण केलं. कॅंडीमध्ये देशाचा झेंडा फडकावून संघातील सदस्यांनी राष्ट्रगीत गायलं. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होते. बीसीसीआयने ध्वजारोहणाचा व्हिडीओ जारी केला आहे. 

एक दिवसापूर्वीच टीम इंडियाने 85 वर्षांनंतर पहिल्यांदा विदेशी धरतीवर व्हाइटवॉश देऊन भारतीयांना स्वातंत्र्यदिनाचं गिफ्ट दिलं होतं. पल्लेकल कसोटीत  श्रीलंकेचा दुसरा डाव 181 धावांत गुंडाळून एक डाव आणि 171 धावांनी विजय साजरा केला. या विजयासोबत भारताने श्रीलंकेला कसोटी मालिकेत 3-0 ने व्हाइटवॉश दिला. यासोबत कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेच्या धरतीवर इतिहास रचला. विदेशी धरतीवर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्विप देण्यासाठी भारताला तब्बल 85 वर्ष वाट पाहावी लागली. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 28 वर्षांच्या विराट कोहलीने आपल्या अवघ्या 29 व्या कसोटी सामन्यात कर्णधारपद सांभाळताना हा पराक्रम केला. 

विदेशी धरतीवर 78 व्या मालिकेत रचला इतिहास-विदेशी धरतीवर 78 व्या मालिकेतील हा भारताचा 18 वा मालिका विजय आहे. यादरम्यान पहिल्यांदाच भारताने 3-0 ने व्हाइटवॉश दिला आहे. 1932 सालापासून भारताने कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरूद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात सीके नायडू यांनी भारताचं कर्णधारपद सांभाळलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 33 जणांनी भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद भुषवलं आहे, पण केवळ कोहलीलाच हा पराक्रम करता आला.   विदेशात क्लीन स्वीपचा विचार केला, तर भारताने आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. पण, या मालिकांत केवळ एक किंवा दोन सामने मर्यादित होते. भारताने 2000मध्ये बांगलादेशाचा एका कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-0 ने, तर 2004 व 2010 मध्ये 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पराभव केला होता.सलग मालिका विजयाच्या वर्ल्ड रेकॉर्डपासून एक पाऊल दूर-भारतीय टीम सलग मालिका विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. सलग मालिका विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड ऑस्ट्रेलिया संघाच्या नावे आहे. त्यांनी सलग 9 मालिका विजय मिळवले होते. यापूर्वी भारताने 2008 आणि 2010 च्या दौ-यात अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी आणि विरेंद्र सेहवाग या तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली 5 सलग विजय मिळवले होते.  टेस्ट क्रिकेटमध्ये सलग मालिका विजयात कोण पुढे- -ऑस्ट्रेलिया -9 (2005/06-2008) -भारत- 8 (2015- 2017) -इंग्लंड -8 (1884-1892) -ऑस्ट्रेलिया -7 (1945/46-1951/52) -ऑस्ट्रेलिया -7 (1956/57-1961) -वेस्टइंडीज-7 (1982/83-1985/86) -ऑस्ट्रेलिया- 7 (2001/02-2003/04) 

आणखी वाचाIndependence Day 2017 : देशभरात उत्साहात साजरा होतोय स्वातंत्र्यदिनस्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण न ठरता ‘पिकनिक डे’ ठरू लागले आहेत - उद्धव ठाकरे

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसVirat Kohliविराट कोहली