शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Oxygen: 'टाटा देऊ शकतात, इतर का नाही? काहीही करा, इस्पितळांना तत्काळ ऑक्सिजन पुरवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 04:16 IST

Coronavirus: ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची जबाबदारी पूर्णत: केंद्रावर आहे. आवश्यक असल्यास ऑक्सिजनचा पूर्ण उपयोग उद्योगांऐवजी वैद्यकीय वापरासाठी करावा, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले आहे.

नवी दिल्ली : काहीही करा, राजधानी दिल्लीतील इस्पितळांना कोणत्याही मार्गाने तत्काळ ऑक्सिजनचा पुरवठा करा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्राला दिले. टाटा आपल्या पोलाद प्रकल्पात तयार केलेला ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी देऊ शकतात, मग दुसरे असे का करू शकत नाहीत? पोलाद आणि पेट्रोलियम कंपन्यांसह सर्व कंपन्या ऑक्सिजन आयात होईपर्यंत कमी क्षमतेवर चालविल्यास आकाश कोसळणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करणाऱ्या दिल्लीतील इस्पितळांना ऑक्सिजनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत असल्याने गंभीर स्थिती ओढवली आहे. अशी स्थिती असताना केंद्र का जागे होत नाही? इस्पितळातील ऑक्सिजन संपत आहे; परंतु पोलाद कारखाने चालू आहेत, हे धक्कादायक आहे.

टाटा आपल्या पोलाद प्रकल्पातील ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी देऊ शकतात, मग दुसरे असे का करू शकत नाही. ही लालसेची परिसीमा आहे. मानवता शिल्लक आहे की नाही? असेही न्यायालय म्हणाले. इस्पितळातील स्थिती सुधारेपर्यंत अशा उद्योगांनी आपले उत्पादन थांबवावे. उद्योगांनी ऑक्सिजनचे उत्पादन वाढवावे आणि वैद्यकीय उपयोगासाठी त्याचा पुरवठा अन्य राज्यांना करण्यासाठी उत्पादित ऑक्सिजन केंद्राला द्यावा, असे निर्देशही उच्च न्यायालयाने उद्योगांना दिले आहेत.दिल्लीपुरतेच आम्ही चिंतित नाही. देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार काय करीत आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. 

केंद्राच्या धोरणांवर नाराजीऑक्सिजनचा पुरवठा करण्याची जबाबदारी पूर्णत: केंद्रावर आहे. आवश्यक असल्यास ऑक्सिजनचा पूर्ण उपयोग उद्योगांऐवजी वैद्यकीय वापरासाठी करावा. ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्याचे मार्ग तुम्ही शोधत नाहीत. उधार घ्या किंवा चोरी करा. ऑक्सिजनचे उत्पादन करणारे पोलाद प्रकल्प चालविण्यास परवानगी देण्याच्या केंद्राच्या धोरणांवर न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTataटाटाHigh Courtउच्च न्यायालय