शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

टाटा VS मिस्त्री लढा सुरूच राहणार

By admin | Updated: February 8, 2017 02:14 IST

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांना सर्व कंपन्यांच्या संचालकपदावरूनही दूर करण्यात आले

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांना सर्व कंपन्यांच्या संचालकपदावरूनही दूर करण्यात आले असले तरी मिस्त्री यांचा टाटांच्या विरोधातील कायदेशीर लढा सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.टाटा सन्सच्या विशेष सर्वसाधारण सभेत काल मिस्त्री यांना संचालक पदावरून दूर करण्यात आले. एंजल स्टॉक ब्रोकिंगचे संशोधन विभागाचे प्रमुख वैभव अग्रवाल यांनी सांगितले की, मिस्त्री यांना संचालकपदावरून दूर करून टाटा उद्योग समूहाने याबाबतची अनिश्चितता संपविली आहे. आता कंपनी केवळ व्यवसायाकडे लक्ष देऊ शकेल. मात्र दोन्ही बाजूंचा कायदेशीर लढा सुरूच राहील असे दिसते. टीसीएसचे सीईओ एन. चंद्रशेखरन यांची याआधीच टाटा सन्सच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. ते २१ फेब्रुवारी कार्यभार स्वीकारणार आहेत. याशिवाय कंपनीने संचालकपदाची जागा रिक्त ठेवलेली नाही.आपला लढा कायदेशीर व्यासपीठावर घेऊन जात आहोत, असे मिस्त्री यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटले होते. गुंतवणूक सल्लागार एस. पी. तुलसीयन यांनी सांगितले की, ही लढाई दीर्घकाळ चालेल. हा खटला कंपनी लवादातून उच्च न्यायालयात व तेथून सर्वोच्च न्यायालयात जाईल.टाटा सन्सची विशेष सर्वसाधारण सभा रोखण्यासाठी सायरस मिस्त्री यांच्या गुंतवणूक संस्थांनी राष्ट्रीय कंपनी लवादासमोर याचिका दाखल केल्या होत्या. त्या लवादाने शुक्रवारी फेटाळून लावल्या होत्या. टाटांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी लवादासमोर सांगितले होते की, कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा होऊ द्यावी. संचालकाची एक जागा ३0 दिवसांपर्यंत रिक्त ठेवली जाईल. मिस्त्री यांना टाटा सन्सच्या संचालकपदावरून हाकलल्यानंतर शापूरजी पालनजी कुटुंबाचा कोणीही प्रतिनिधी टाटाच्या संचालक मंडळात नाही. कित्येक दशकांत पहिल्यांदाच असे घडत आहे. मिस्त्री यांचे वडील पालनजी शापूरजी मिस्त्री हे १९८0 ते २00४ या काळात संचालक मंडळावर होते. सायरस मिस्त्री २00६मध्ये संचालक मंडळावर आले. टाटामध्ये मिस्त्री यांच्या कुटुंबाची १९६५पासून मोठी हिस्सेदारी आहे.