शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना बांगलादेशचे शपविधीचे निमंत्रण, पंतप्रधान जाणार की प्रतिनिधी पाठविणार? काय ठरतेय दिल्लीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 10:38 IST

PM Modi Bangladesh Visit: बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान १७ फेब्रुवारीला शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण मिळाले असले तरी त्याच दिवशी मुंबईत मॅक्रॉन यांच्याशी बैठक आहे. वाचा सविस्तर वृत्त.

बांगलादेशातील ऐतिहासिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर बीएनपी नेते तारिक रहमान १७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी ढाका येथून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १३ देशांच्या राष्ट्रप्रमुखांना अधिकृत निमंत्रण धाडले आहे. मात्र, त्याच दिवशी मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत मोदींची महत्त्वाची द्विपक्षीय बैठक असल्याने, पंतप्रधान स्वतः ढाका दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी असल्याचे वर्तवण्यात येत आहे.

सुमारे १७ वर्षांच्या वनवासानंतर तारिक रहमान यांनी बांगलादेशच्या राजकारणात झंझावाती पुनरागमन केले आहे. त्यांच्या 'बांगलादेश नॅशनल पार्टी'ने २९७ पैकी २०९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर त्यांच्या सोबतीला असलेल्या जमात-ए-इस्लामीला ६८ जागा मिळाल्या आहेत. शेख हसीना यांच्या अवामी लीगला या निवडणुकीत सहभाग घेता आला नाही, त्यामुळे ही सत्तापालट बांगलादेशच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक मानली जात आहे.

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने भारतासह चीन, पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की, यूएई आणि कतार यांसारख्या १३ देशांना आमंत्रित केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ या सोहळ्याला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.

भारत-बांगलादेश संबंध आणि 'हसीना' पेचपंतप्रधान मोदींनी तारिक रहमान यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले आहे. "भारत आणि बांगलादेश हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नात्यांनी जोडलेले शेजारी आहेत," अशा शब्दांत मोदींनी दोन्ही देशांच्या मैत्रीचा पुनरुच्चार केला. मात्र, सध्या भारतात असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी नव्या सरकारकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात भारत आपल्या शेजारील राष्ट्राशी कूटनीतिक संबंध कसे हाताळतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

फ्रान्ससोबतची बैठक की ढाका दौरा?१७ फेब्रुवारीला मुंबईत होणारी मोदी-मैक्रॉन बैठक भारताच्या युरोप धोरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. संरक्षण, इंडो-पॅसिफिक क्षेत्र आणि तंत्रज्ञान या विषयांवर येथे चर्चा होणार आहे. अशा स्थितीत पंतप्रधान मोदी स्वतः न जाता भारताचा एखादा वरिष्ठ सरकारी प्रतिनिधी किंवा मंत्री ढाका येथील सोहळ्याला उपस्थित राहू शकतो, असे संकेत मिळत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Modi's Bangladesh invite: Will PM attend or send a representative?

Web Summary : Bangladesh's new PM, Tariq Rahman, invited Modi to his inauguration. With Macron's visit clashing, Modi may send a representative. India-Bangladesh relations face scrutiny amid potential extradition requests for Sheikh Hasina. Focus is on balancing diplomacy and strategic partnerships.
टॅग्स :BangladeshबांगलादेशNarendra Modiनरेंद्र मोदी