तारसा... जोड
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
स्वच्छतागृहाचे तीनतेरा
तारसा... जोड
स्वच्छतागृहाचे तीनतेरातहसील कार्यालयातील स्वच्छतागृह व मुतारीची पाहणी केली असता, सर्वत्र घाण व दुर्गंधी दिसून आली. तेथे धड उभे राहण्यासही जागा मिळत नाही. सर्वत्र तंबाखू, खर्रा व पान खाऊन थुंकून ठेवले आहे. भिंती या थुंकीची रंगरंगोटी झाली असल्याचे आढळते.या इमारतीच्या दर्शनीभागात कुठेच गुटखाबंदी वा स्वच्छतेबाबत फलक लावण्यात आले नाहीत. शिवाय स्वच्छतेची अंमलबजावणी करण्यास प्रशासन पुढाकार घेत नसल्याने या कार्यालयात दिवसेंदिवस घाण वाढतच आहे. ......सेतू केंद्र अद्यापही शेडविनाचतहसील कार्यालयात असलेल्या सेतू केंद्रात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक विविध प्रमाणपत्र व दाखल्यांसाठी गर्दी करतात. यात विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असते. परंतु येथील सेतू केंद्रात उभे राहण्यासाठी साधे शेडदेखील नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. उन्हाळा व पावसाळ्याच्या दिवसांत येथील सेतू केंद्रात थांबावे कसे, असा प्रश्न निर्माण होतो. तहसील कार्यालयातील या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष देऊन कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.