तनिसी, वेस्ली, स्नेहा, नागेश, शांतेश विजेते
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
मडगाव : मडगाव क्रिकेट क्लबतर्फे आयोजित अखिल गोवा पातळीवरील 36 व्या मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत तनिसी कीर्तनी, वेस्ली द रोझारियो, स्नेहा राणे, नागेश वेरेकर व शांतेश म्हापसेकर यांनी आपआपल्या गटात अव्वल स्थान प्राप्त केले.
तनिसी, वेस्ली, स्नेहा, नागेश, शांतेश विजेते
मडगाव : मडगाव क्रिकेट क्लबतर्फे आयोजित अखिल गोवा पातळीवरील 36 व्या मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत तनिसी कीर्तनी, वेस्ली द रोझारियो, स्नेहा राणे, नागेश वेरेकर व शांतेश म्हापसेकर यांनी आपआपल्या गटात अव्वल स्थान प्राप्त केले.स्पर्धा मडगाव येथील एमसीसीच्या टेबल टेनिस कोर्टवर आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या बक्षीस वितरणास उद्योजक तथा माजी टेबल टेनिस खेळाडू दिनेश त्रिकन्नाड व अरुण वेर्लेकर उपस्थित होते. या वेळी एमसीसी क्लबचे अध्यक्ष योगेश नाईक, कोषाध्यक्ष एकनाथ कामत, जीटीटीएचे सचिव विष्णू कोलवाळकर यांचीही उपस्थिती होती. एमसीसीचे सचिव अपूर्व भेंब्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.सविस्तर निकाल : मिनी कॅडेट- मुली- स्नेहा मेस्ता वि. वि. तृष्णा हम्मणवार 11-7, 11-9, 11-5. मुलगे- शांतेश म्हापसेकर वि. वि. अद्वैत मुद्रस 11-6, 11-3, 11-4. कॅडेट गट : मुली- स्नेहा राणे वि.वि. सनीशा शेट्ये 11-8, 11-3, 11-8. मुले- नागेश वेरेकर वि.वि. शांतेश म्हापसेकर 11-5, 13-11, 7-11 व 11-7. सब ज्युनियर गट : मुली- तनिसी कीर्तनी वि.वि. पृथा र्पीकर 11-9, 11-5, 11-3. मुलगे- वेस्ली द रोझारियो वि.वि. मंदार जोशी 12-10, 11-9, 11-9. (क्रीडा प्रतिनिधी)