शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपला देशाचे विभाजन हवे; आमच्यावर हिंदी लादू नका, अन्यथा...', CM स्टॅलिन कडाडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 17:15 IST

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विधानसभेत हिंदीविरोधात ठराव मांडला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

चेन्नई:हिंदी विरुद्ध दाक्षिणात्य भाषा, हा वाद फार पूर्वीपासून चालत आला आहे. यातच आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M. K. Stalin) यांनी विधानसभेत, राज्यात हिंदी भाषा लागू करण्याच्या विरोधात ठराव मांडला आहे. मंगळवारी विधानसभेतील भाषणादरम्यान स्टॅलिन यांनी केंद्रातील भाजप सरकारव जोरदार हल्लाही केला. ते म्हणाले की, भाजपला असे वाटते की ते केवळ हिंदी लागू करण्यासाठीच सत्तेवर आले आहेत. भाजपला हिंदी भाषेला ताकदीचे प्रतीक बनवायचे आहे, त्यांना इतर भाषा संपवायच्या आहेत. पण, आम्ही असे होऊ देणार नाही.

त्यांच्यासाठी हिंदी महत्वाचीस्टॅलिन म्हणतात की, भाजपला प्रशासनातून इंग्रजी पूर्णपणे काढून टाकायची आहे. त्यांना देशातील नागरिकांना इंग्रजी भाषेचे ज्ञान घेण्यापासून थांबवायचे आहे. भाजप म्हणते की, राज्याची भाषा फक्त बोलण्यासाठीच आहे. पण, त्यांच्यासाठी फक्त हिंदी महत्वाची आहे. भाजपला सर्व भाषा प्रिय असतील, तर त्यांनी आठव्या अनुसूची अंतर्गत तामिळ आणि इतर भाषांना केंद्र सरकारची प्रशासकीय भाषा घोषित करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आमच्यावर हिंदी लादू नकाते पुढे म्हणाले की, आमचे राज्य दुहेरी भाषा धोरणाने (इंग्रजी आणि तमिळ) चालत आहे. सर्व प्रादेशिक भाषांना भारताच्या अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा अशी आमची इच्छा आहे. तामिळनाडूच्या लोकांना हे माहीत आहे, म्हणूनच ते फक्त तीन भाषांवर आधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला विरोध करत आहेत. बिगरहिंदी भाषिकांवर हिंदी लादू नये. बिगर हिंदी भाषिकांसाठी इंग्रजीचा पर्याय असायला हवा. केवळ हिंदी भाषिकांना प्राधान्य देऊ नये आणि असे झाल्यास ते संविधानाचे उल्लंघन ठरेल, अशी टीकाही त्यांनी यावेळे केली.

भाजपला भारताचे विभाजन करायचे आहेस्टॅलिन पुढे म्हणाले की, 'भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार भारताचे तीन भागात विभाजन करू इच्छिते. हिंदी भाषिक राज्ये, ज्या प्रदेशात कमी हिंदी बोलली जाते आणि जिथे हिंदी अजिबात बोलली जात नाही, असे प्रदेश. तामिळनाडू या तिसऱ्या श्रेणीत येतो. आम्ही जुन्या भाषेचे आणि संस्कृतीचे मालक आहोत. आम्हाला तृतीय श्रेणीचे नागरिक बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वांनी या विरोधात उभे राहून आवाज उठवला पाहिजे.'

भाजपला इतर भाषा संपवायच्या आहेतयावेळी स्टॅलिन यांनी 1965च्या हिंदी विरोधी आंदोलनाची आठवण करुन दिली. ते म्हणाले की, 'द्रमुकने आंदोलन सुरू केले होते आणि त्यानंतर ते पहिल्यांदाच सत्तेत आले. भाषा हे आपले जीवन, आपला आत्मा आणि आपले भविष्य आहे. मातृभाषेला इतर भाषांच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी द्रमुकची स्थापना करण्यात आली. भाजप हिंदी लागू करून, इतर भाषा नष्ट करण्याच्या विचारात आहे. 'देश एक सब एक' या धोरणाखाली त्यांना एक भाषा करायची आहे. पण, आम्ही असे काहीही होऊ देणार नाही,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूhindiहिंदीCentral Governmentकेंद्र सरकार