शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

तामिळी तिढा कायम

By admin | Updated: February 9, 2017 02:37 IST

व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात उभे ठाकणाऱ्या मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी गरज भासल्यास मी राजीनामा परत घेईन, असे बुधवारी जाहीर केले

चेन्नई : व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात उभे ठाकणाऱ्या मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी गरज भासल्यास मी राजीनामा परत घेईन, असे बुधवारी जाहीर केले असून, ‘माझी शक्ती विधानसभेतच कळेल,’ असा दावाही केला. त्यांच्या बंडामुळे राज्यपाल विद्यासागर राव यांनी चेन्नईत जाण्याचे टाळले. परिणामी शशिकला यांच्या शपथविधीविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. राव चेन्नईला कधी जाणार, हे माहीत नाही, असे मुंबईतील राजभवनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शशिकला यांच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी झालेल्या निवडीला निवडणूक आयोगाकडे आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे आयोगाने त्यांच्याकडून तसेच पक्षाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. आयोगाने समाधान होईपर्यंत त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र १३0 पैकी एकही आमदार फुटू नये, म्हणून त्या सर्वांना एका हॉटेलात डांबण्यात आले असल्याचे वृत्त आहे. तामिळनाडूतील घटनांशी सरकार व भाजपा यांचा संबंध नाही, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू म्हणाले. (वृत्तसंस्था)शशिकला यांनी अण्णा द्रमुकच्या आमदारांची बुधवारी तातडीची बैठक बोलावली. त्यास १३0 आमदार उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. शशिकला यांच्यासमवेत अधिक आमदार असले तरी कार्यकर्ते आणि जनतेची सहानुभूती मिळवण्यात पनीरसेल्वम यशस्वी ठरले असून, त्यांच्यावर अन्याय झाला, अशीच भावना व्यक्त होत आहे. शशिकला यांच्यापुढे हीच मोठी अडचण आहे. पनीरसेल्वम यांच्यासोबत दोन आमदार, माजी विधानसभाध्यक्ष पांडियन व खा. मैत्रेयन उपस्थित होते. जयललिता यांची भाची दीपा जयकुमार आणि खासदार शशिकला पुष्पा यांनीही पनीरसेल्वम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पनीरसेल्वम द्रमुकच्या हातातील खेळणे - शशिकलापनीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपदी राहू द्यायचे नाही, असे शशिकला यांनी ठरविले असून, त्यांनी सर्व जिल्हा सचिवांना चेन्नईत बोलावून घेतले आहे. अण्णा द्रमुकमध्ये पक्षाच्या जिल्हा सचिवांची भूमिका महत्त्वाची असते. पनीरसेल्वम द्रमुकच्या हातातील खेळणे बनले असून, करुणानिधी व स्टॅलिन यांच्या सांगण्यावरून त्यांनी मुख्यमंत्रिपद न सोडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप शशिकला यांनी केला. त्या म्हणाल्या की, पनीरसेल्वम यांच्या धमक्यांपुढे पक्ष कदापि गुडघे टेकणार नाही. पनीरसेल्वम यांनी मात्र द्रमुकशी हातमिळवणीच्या आरोपाचे खंडन केले. राजीनाम्यासाठी माझा छळ करण्यात आला, असेही ते म्हणाले.