शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूमध्ये संघाची सत्ता येऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 05:34 IST

राहुल गांधी; स्टॅलिन लवकरच मुख्यमंत्री

कृष्णगिरी : तामिळनाडूवर नागपूरची म्हणजे रा. स्व. संघाची सत्ता कधीही येऊ देणार नाही, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी जाहीर केले. द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन तामिळनाडूचे लवकरच मुख्यमंत्री होतील, असाही विश्वास त्यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.

राहुल गांधी म्हणाले की, नीरव मोदी, विजय मल्ल्यासारख्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली व ते विदेशात पळून गेले. या कर्जबुडव्यांपैकी एकही जण अद्याप तुरुंगात गेलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्ज न फेडता आलेल्या एकाही शेतकऱ्याला आम्ही तुरुंगात धाडणार नाही. कर्जबुडव्या श्रीमंत लोकांवर काहीही कारवाई होत नाही, पण त्याच गुन्ह्यापायी गरीब शेतकऱ्यांना शिक्षा सुनावली जाते हे अयोग्य आहे.

राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदी, मेहुल चोकसीला प्रत्येकी ३५ हजार कोटी रुपये व विजय मल्ल्याला १० हजार कोटी रुपये दिले आहेत. गेल्या पाच वर्षांत मोदींनी आपल्या १५ मित्रांसाठीच सरकार चालविले त्या सर्वांची नावेजनतेला माहिती आहेत. त्यामध्ये अनिल अंबानी, नीरव मोदी, मेहुल चोकसी आदींचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

न्याय योजना फायदेशीरराहुल गांधी यांनी सांगितले की, देशातील सर्वात गरिबांतील गरिब कुटुंबांना किमान उत्पन्नाची हमी देणारी न्याय योजना ही त्या लोकांमध्ये क्रयशक्ती निर्माण करेल.अशा योजनेमुळे तामिळनाडूमध्ये नवीन कारखाने उभारले जातील तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल.तामिळनाडूमधील वस्त्रोद्योगनिर्मितीची आगारे असलेली तिरुपूर, कांचीपुरमसारखी ठिकाणे पुन्हा पहिल्यासारखीच बहरतील. त्यातून युवा पिढीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू