शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेच्या मदतीसाठी तामिळनाडूचा हात, एका महिन्याचा पगार देणार डीएमके खासदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 18:02 IST

तामिळनाडू विधानसभेत एक प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे, यात श्रीलंकेला तांदूळ आणि औषध पाठविण्याची परवानगी मागण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी याला परवानगीही दिली आहे. 

श्रीलंका सध्या प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहे. याच पार्श्वभूमीवर, तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष असलेल्या डीएमकेने आपले सर्व खासदार त्यांचा एक महिन्याचा पगार श्रीलंकेला मदत म्हणून देतील, अशी घोषणा केली आहे. यापूर्वी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी, जनतेने श्रीलंकेच्या मदतीसाठी समोर यावे आणि त्यांना आवश्यक साहित्य जमा करण्यास मदत करावी, असे आवाहन केले होते. 

याशिवाय तामिळनाडू विधानसभेत एक प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे, यात श्रीलंकेला तांदूळ आणि औषध पाठविण्याची परवानगी मागण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी याला परवानगीही दिली आहे. 

यासंदर्भात बोलताना एस जयशंकर म्हणाले, श्रीलंकेला भारत सरकारकडून जी मदत दिली जात आहे, त्यात तामिळनाडूच्या योगदानामुळे वाढ होईल. तसेच, श्रीलंकेत मदत साहित्य पाठवण्यासंदर्भात राज्य सरकार तामिळनाडूच्या चीफ सेक्रेटरींना केंद्रशी समन्वय साधण्यास सांगू शकते.

श्रीलंकेसमोर आतापर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट -श्रीलंका सध्या सर्वात वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. देशासमोर आतापर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. लोकांना रेशनही मिळणे अवघड झाले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. सरकारच्या तिजोरीतील परकीय चलन जवळपास संपले आहे. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. सरकारच्या सर्व खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आता तेही उघडपणे सरकार विरोधात बोलत आहेत. तर दुसरीकडे, श्रीलंका सरकार जगाकडे मदतीसाठी आवाहन करत आहे. भारतासह जगातील अनेक देश श्रीलंकेला मदत करत आहेत.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाTamilnaduतामिळनाडूEconomyअर्थव्यवस्था