शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

"थोडा वेळ थांब, मी परत येईन"; मृत आईच्या पायाला स्पर्श करुन बोर्डाच्या परीक्षेला बसला मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:14 IST

तमिळनाडूमध्ये परीक्षेपूर्वी आईचे निधन झाल्यानंतरही बारावीच्या विद्यार्थ्याने तिचे आशीर्वाद घेत परीक्षा दिली आहे.

तमिळनाडूमध्ये बारावीच्या एका विद्यार्थ्यासोबत हृदयद्रावक घटना घडली आहे. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान तामिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील वल्लीयुर इथल्या विद्यार्थ्यासोबत अतिशय दुःखद प्रसंग घडला आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशी बारावीच्या विद्यार्थ्याच्या आईचा मृत्यू झाला. आईच्या निधनानंतरही विद्यार्थ्याने आपले दुःख बाजूला ठेवून बारावीची परीक्षा दिली. परीक्षेला जाण्याआधी विद्यार्थ्याने मृत आईचे दर्शन घेतलं. या घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून विद्यार्थ्याच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.

तिरुनेलवेली जिल्ह्यातील वल्लीयुर येथील सुनील कुमार नावाच्या विद्यार्थ्याने अनोखा आदर्श घालून दिला आहे. अण्णा नगरमध्ये राहणाऱ्या कृष्णमूर्ती यांची पत्नी सुबललक्ष्मी यांचे सोमवारी निधन झाले. तर कृष्णमूर्ती यांचे ६ वर्षांपूर्वीचं निधन झालं होतं. कृष्णमूर्तींच्या जाण्यानंतर सुबललक्ष्मी यांनी त्यांच्या मुलांना  वाढवले. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे सोमवारी सुबललक्ष्मी यांचे निधन झाले. सुबललक्ष्मी यांच्या निधनाने दोन्ही मुलांवरील आई वडिलांचे छत्र हरपलं आहे. मात्र अशातही सुनील कुमारने दुःखात तमिळ भाषेची परीक्षा दिली.

दुपारी सुनील कुमार घरी परतल्यानंतर सुबललक्ष्मी यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. परीक्षेला जाण्यापूर्वी सुनील कुमारने आईला हात लावला आणि "आई, थोडा वेळ थांबा, मी परत येईन," असं म्हटलं होतं. हे ऐकून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं. एकीकडे या घटनेने सुनीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर दुसरीकडे त्याने एक नवा आदर्श ठेवला आहे.

घरातून बाहेर पडण्यापूर्वी सुनीलने हॉल तिकीट आईच्या पायावर ठेवले आणि आशीर्वाद घेतले. पण तो रडला. त्याच्या नातेवाईकाने त्याला पकडून परीक्षा केंद्रावर नेले. सुनीलने परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे आणि जीवनात यशस्वी व्हावे यापेक्षा तुझ्या आईला दुसरे काही नको असेल, असं त्याच्या नातेवाईकाने त्याला सांगितले.

दरम्यान, याआधी लातूरमध्येही असाच प्रकार घडला होता. वडिलांचे अंत्यविधी अर्ध्यावर सोडून दिशा नागनाथ उबाळे नावाची विद्यार्थिनी दहावीची मराठीची परीक्षा देण्यासाठी आली होती. दिशाचे वडील आजाराशी झुंज देत होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धाडस दाखवत, १६ वर्षीय दिशाने आपले अश्रू पुसले, वडिलांना अखेरचा निरोप दिला आणि मराठीचा पेपर देण्यासाठी औसा येथील अझीम हायस्कूलमधील परीक्षा केंद्राकडे निघाली.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूHSC / 12th Exam12वी परीक्षा