शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक Video : अन्नाच्या शोधात आलेल्या हत्तीवर फेकला जळता टायर; मुक्या जीवाचा करुण अंत

By स्वदेश घाणेकर | Updated: January 23, 2021 10:18 IST

तामिळनाडूत हत्ती आणि माणसं यांच्यातला संघर्ष काही नवा नाही. काही महिन्यांपूर्वी मानवी वस्तीत घुसलेल्या गर्भवती हत्तीणीला ज्वलंत स्फोटक खायला दिल्याच्या प्रकारानं देशाला हादरवून सोडलं होतं.

तामिळनाडूत हत्ती आणि माणसं यांच्यातला संघर्ष काही नवा नाही. काही महिन्यांपूर्वी मानवी वस्तीत घुसलेल्या गर्भवती हत्तीणीला ज्वलंत स्फोटक खायला दिल्याच्या प्रकारानं देशाला हादरवून सोडलं होतं. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या कृतीनं गर्भवती हत्तीणीचा तडफडून मृत्यू झाला होता. आता असाच एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी ४० वर्षीय हत्ती तामिळनाडूतील एका वस्तीत घुसला आणि त्याला पळवून लावण्यासाठी लोकांनी त्याच्या अंगावर जळतं टायर फेकला. तो टायर हत्तीच्या कानात अडकला आणि त्यामुळे त्याचं डोकं भाजलं. थेप्पाकडू येथील कॅम्पमध्ये हत्तीवर उपचार सुरू होते, परंतु हत्तीचा दुर्देवी मृत्यू झाला

हत्तीच्या अंगावर पेट घेतलेला टायर फेकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निलगीरी येथील मसिनागुडी या प्रसिद्ध पर्यटन ठिकाणातील ही घटना आहे. अन्नाच्या शोधात हा हत्ती मानवी वस्तीत आला होता. ही घटना दोन महिन्यांपूर्वीची असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होता. हत्तीच्या पाठीवर अनेक दुखापती झाल्या होत्या आणि त्याच्या कानाजवळचा भाग जळाला होता, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. पण, ही घटना दोन आठवड्यांपूर्वीची असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला गेला आहे.   ''हा व्हिडीओ आम्ही पाहिला आणि त्याच्या आधारावर आम्ही तपास केला. प्रसाथ ( ३६) व रेयमंड डीन ( २८) या दोघांना अटक केली गेली आहे आणि रिकि रायन ( ३१) याचा शोध सुरू आहे. या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे,''असे मुडूमलाई टायगर संरक्षित विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितले.  

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूSocial Viralसोशल व्हायरल