शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत कॉपर प्लांटला मद्रास हायकोर्टाची स्थगिती, आतापर्यंत 11 जणांचा गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 12:43 IST

तामिळनाडूच्या तुतिकोरिन या किनारी जिल्ह्यात वेदान्त उद्योग समूहातील स्टरलाइट कंपनीतर्फे उभारण्यात येत असलेल्या कॉपर प्लांटच्या बांधकामाला मद्रास उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.

मदुराई-  तामिळनाडूच्या तुतिकोरिन या किनारी जिल्ह्यात वेदान्त उद्योग समूहातील स्टरलाइट कंपनीतर्फे उभारण्यात येत असलेल्या कॉपर प्लांटच्या बांधकामाला मद्रास उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या कॉपर प्लांटच्या विरोधात हजारो स्थानिकांनी निदर्शनं केली आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जवळपास 11 लोकांचा मृत्यू झाला असून, केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात तामिळनाडू सरकारकडून अहवाल मागवला आहे.गोळीबाराचं वृत्त पोलिसांनी फेटाळलं असून, मात्र मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पोलीस गोळीबारात निदर्शक मृत्युमुखी पडल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणाची चौकशी माजी न्यायाधीशांमार्फत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, तर जखमींना 3 लाखांची मदत जाहीर केली. या प्रकारामुळे द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी कुमारस्वामी यांच्या शपथविधीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे हवा व पाण्याचे अतोनात प्रदूषण होते, असा स्थानिकांचा व स्वयंसेवी संस्थांचा आरोप आहे.प्रचंड बंदोबस्त मुख्यमंत्री एडापडी पलानीस्वामी यांनी तेथील जनतेला शांततेचे आवाहन केले तर द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी पोलिसी अत्याचारांचा निषेध केला. तुतिकोरिनमध्ये आता 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू