शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

"...तर तामिळनाडू राज्याचे ८ खासदार कमी होऊ शकतात"; सीएम एमके स्टॅलिन यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:36 IST

स्टॅलिन म्हणाले, "राज्यात लोकसंख्येवर आधारीत मतदारसंघांची पुनर्रचना (सीमांकन) झाल्यास राज्यातील लोकसभेच्या जागा कमी होऊ शकतात. परिणामी राज्याचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होईल.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यातील जनतेला लवकरात लवकर मुलं जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. "आम्ही पूर्वी म्हणत होतो, आरामात मुलं जन्माला घाला. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. यामुळे लवकरात लवकर मुलं जन्मालाला घालणे आवश्यक आहे," असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. ते सोमवारी नागापट्टिनम जिल्ह्याच्या पक्ष सचिवांच्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरी कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला वरील आवाहन केले आहे.

स्टॅलिन म्हणाले, "राज्यात लोकसंख्येवर आधारीत मतदारसंघांची पुनर्रचना (सीमांकन) झाल्यास राज्यातील लोकसभेच्या जागा कमी होऊ शकतात. परिणामी राज्याचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होईल. तामिळनाडूची यशस्वी फॅमिली पॉलिसी प्लॅनिंग आता राज्यासाठी हानिकारक ठरताना दिसत आहे."

स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी 5 मार्चला एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यासाठी सर्व पक्षांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. एवढेच नाही, तर या मुद्द्यावर आपण एकत्रित येऊन आपल्या अधिकाराचे रक्षण करायला हवे, असेही स्टॅलिन यांनी म्हटले आहे. 

फॅमिली प्लॅनिंग पॉलिसीने राज्याचे नुकसान - 25 फेब्रुवारीला झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर बोलतानाही स्टॅलिन यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. स्टॅलिन म्हणाले होते, "तामिलनाडूमध्ये फॅमिली प्लॅनिंग पॉलिसी यशस्वीपणे लागू केल्याने आता राज्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जर लोकसंख्या जनगणनेच्या आधारे सीमांकन करण्यात आले, तर तामिळनाडूला आठ खासदार गमवावे लागतील. यामुळे संसदेत तमिळनाडूचे प्रतिनिधित्व कमी होईल."लोकसभेच्या जागांसाठी सीमांकन प्रक्रिया २०२६ पासून... -मतदारसंघांची पुनर्रचना अथवा सीमांकन करण्यासाठी एक आयोग स्थापन केला जात असतो. यापूर्वी १९५२, १९६३, १९७३ आणि २००२ मध्येही आयोग स्थापन करण्यात आले आहेत. लोकसभेच्या जागांसाठी सीमांकन प्रक्रिया २०२६ पासून सुरू होणार आहे. यामुळे २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ७८ जागा वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूMember of parliamentखासदार