शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी- भाजप छुप्या युतीची चर्चा संपुष्टात; राष्ट्रीय दर्जा काढल्याने मित्रपक्षांच्या शंका फिटल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 07:15 IST

राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळणारे काही विशिष्ट लाभ, २३ वर्षांपासून असलेली प्रतिष्ठा

नवी दिल्ली :

राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळणारे काही विशिष्ट लाभ, २३ वर्षांपासून असलेली प्रतिष्ठा; तसेच पक्ष कार्यालयासाठी राजधानी दिल्लीत मिळणारा बंगला वगळता दिल्लीत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे काही गमवावे लागलेले नाही. उलट राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमवावा लागल्यानंतर अदानी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी मित्रपक्षांच्या मनात निर्माण झालेल्या शंका संपुष्टात आल्या आहेत. 

राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला १, केनिंग्ज लेन येथे पक्ष कार्यालयासाठी बंगला देण्यात आला आहे. तो बंगला रिकामा करण्याचे आदेश लवकरच दिले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय आधी १०, बिशंभर दास मार्ग येथे होते. तेथून ते १ केनिंग्ज लेन येथे हलविण्यात आले होते. राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली त्याच दिवशी २३ मार्च रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत ‘ईव्हीएम’संबंधांतील शंका-कुशंका संपविण्यासाठी निवडणूक आयोगाला जाब विचारण्याविषयी एकमत झाले होते. त्यावर पुन्हा विचारमंथन होऊ घातले होते; पण विरोधी पक्षांची दुसरी बैठक होण्याआधीच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला.

अदानींवरून मित्रपक्षांच्या शंका निरर्थकअदानीप्रकरणी जेपीसी चौकशीच्या मुद्यावरून शरद पवार यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या विसंगत भूमिका घेतली तेव्हा ते अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी आणि भाजपला मदत करीत असल्याची शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती; पण निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा रद्द केल्यानंतर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यानच्या छुप्या सहकार्याविषयीच्या मित्रपक्षांच्या शंका निरर्थक ठरल्या आहेत.