शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रेखाच्या राज्यसभेच्या जागेवरून चढाओढ, अक्षय कुमार, जुही व गजेंद्र चौहानांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 09:01 IST

कला, संस्कृती, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रातून राष्ट्रपतींच्या द्वारे राज्यसभेवर जाणा-या 12 व्यक्तींपैकी तीन जणांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे.

मुंबई- कला, संस्कृती, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रांतून राष्ट्रपतींच्या द्वारे राज्यसभेवर जाणा-या 12 व्यक्तींपैकी तीन जणांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे. विशेष म्हणजे या तिन्ही जागा मुंबईतून आहेत. व्यावसायिक अनू आगा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि चित्रपट अभिनेत्री रेखा सध्या या तीन जागी राज्यसभेत आहेत. आता या तीन जागांसाठी होणा-या निवडीवरून चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींसह लेखकांमध्ये आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे.संसदेत सर्वात खराब कामगिरी असल्यानं रेखावर ब-याचदा टीका केली जाते. रेखासह तिघांचा एप्रिलमध्ये राज्यसभेच्या सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. आता रेखाच्या जागी राष्ट्रपतींच्या कोट्यातून कोणाला उमेदवारी मिळणार आहे, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. रेखाच्या जागी खासदार होण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. ब-याच जणांनी भाजपाध्यक्ष अमित शाहांकडे या जागेसाठी बोलणी केली आहेत. तसेच काहींनी मंत्र्यांच्या माध्यमातून स्वतःचा वशिला लावण्याचा प्रयत्न केला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, या जागेसाठी अक्षय कुमार, जुही चावला आणि गजेंद्र चौहान यांच्या नावांची चर्चा आहे. तर दुसरीकडे सलमान खानचे वडील सलीम खान, विवेक ओबेरॉयचे वडील सुरेश ओबेरॉय, ऋषी कपूर, जॅकी श्राफ, वहिदा रहमान, आशा पारेख, मधुर भांडारकर आणि अनुपम खेर यांच्या नावांची शिफारसही पक्षाकडे करण्यात आली आहे. यूपीए सरकारमधल्या एका वजनदार खासदाराच्या आग्रहाखातर रेखा राज्यसभेत जाण्यास तयार झाल्या होत्या. त्या खासदाराला जया बच्चन यांच्याविरोधात रेखाचा वापर करायचा होता. परंतु त्या खासदाराची ही योजना पुरती बासनात गुंडाळली गेली आहे. पंतप्रधान योजनांशी जोडलेले अक्षय कुमार प्रबळ दावेदारमहिलांसाठी शौचालय निर्माण, पंतप्रधान स्वच्छता अभियान आणि शहीद जवानांना मदत करण्यासाठी अक्षय कुमार नेहमीच पुढे असतो. रेखासोबत काम केलेला अक्षय कुमारही राज्यसभेत जाऊ शकतो. तसेच त्यांच्या कॅनडियन नागरिकत्वाची कोणतीही अडचण आल्यास त्याची पत्नी डिंपल कपाडिया हिचाही विचार होऊ शकतो. ती अल्पसंख्याक समुदायातून येते. तर गजेंद्र चौहान यांनाही संधी मिळू शकते. गजेंद्र चौहान हे संघ परिवाराच्या जवळचे आहेत. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाRekhaरेखाSachin Tendulkarसचिन तेंडूलकर