आसाम हिंसाचारावर लष्करप्रमुख करणार अधिकाऱ्यांशी बंदद्वार चर्चा
By admin | Updated: December 27, 2014 18:55 IST
गुवाहाटी/नवी दिल्ली : आसामात एनडीएफबी(एस) बंडखोरांच्या हल्ल्यानंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी बंदद्वार रणनीतिक चर्चा करणार आहेत़
आसाम हिंसाचारावर लष्करप्रमुख करणार अधिकाऱ्यांशी बंदद्वार चर्चा
गुवाहाटी/नवी दिल्ली : आसामात एनडीएफबी(एस) बंडखोरांच्या हल्ल्यानंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी बंदद्वार रणनीतिक चर्चा करणार आहेत़एनडीएफबी(एस) बंडखोरांच्या हल्ल्यात ८१ व्यक्ती मृत्युमुखी पडले आहेत़ शनिवारी लष्करप्रमुख आसामात पोहोचले़ संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, कमांडर स्थितीवर लक्ष ठेवून आहेत़ स्थितीशी निपटण्यासाठी आढावा घेतला जात आहे़ तूर्तास हिंसाचाराचे कुठलेही वृत्त पाही़ कोकराझार, चिरांग, सोनितपूर आणि उदालगुरीच्या सुमारे ७३ हजारांवर लोकांना ६१ मदत शिबिरात ठेवण्यात आले आहे़बॉक्सएनआयएला आसाम घटनांच्याचौकशीचे निर्देशआसामच्या सोनितपूर आणि कोकराझार जिल्ह्यात एनडीएफबी(एस) बंडखोरांनी केलेल्या हत्याकांडप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या चार प्रकरणांचा तपास करण्याचे निर्देश राष्ट्रीय तपास संस्थांना देण्यात आले आहेत़ आसाम सरकारने शुक्रवारी केंद्रास पत्र लिहून या प्रकरणांचा तपास एनआयएने करण्याची विनंती केली आहे़ यावर गृहमंत्रालयाने एनआयएला या प्रकरणांचा तपास आपल्या हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत़