शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रगीताच्या सक्तीवरून न्या. चंद्रचूड यांची टीका, निकाल सुधारण्याचे कोर्टाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 05:05 IST

नवी दिल्ली : देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक खेळ सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजविण्याची आणि त्या वेळी सर्व प्रेक्षकांनी उभे राहण्याची सक्ती करण्याच्या गेल्या वर्षी दिलेल्या आदेशावर न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी कठोर टीका केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या आदेशात सुधारणा करण्याचे संकेत सोमवारी दिले.राजस्थानमधील श्याम नारायण चोकशी यांनी केलेल्या अपिलावर न्या. दीपक ...

नवी दिल्ली : देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक खेळ सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजविण्याची आणि त्या वेळी सर्व प्रेक्षकांनी उभे राहण्याची सक्ती करण्याच्या गेल्या वर्षी दिलेल्या आदेशावर न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी कठोर टीका केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या आदेशात सुधारणा करण्याचे संकेत सोमवारी दिले.राजस्थानमधील श्याम नारायण चोकशी यांनी केलेल्या अपिलावर न्या. दीपक मिस्रा व न्या. अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने ३० नोव्हेंबर २0१६ रोजी हा आदेश दिला होता. तो मागे घ्यावा यासाठीची केरळमधील कोडुंगल्लूर फिल्म सोसायटीची याचिका ज्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी आली तिचे प्रमुख सरन्यायाधीश या नात्याने न्या. दीपक मिस्रा हेच होते. त्यांच्यासोबत न्या. अजय खानविलकर व न्या. चंद्रचूड होते. विशेष म्हणजे न्या. चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशांनी आधी दिलेल्या आदेशावर न्यायपीठावर त्यांच्या शेजारी बसून उघडपणे टीका केली.असे आदेश देणे हे न्यायालयांचे काम नाही, असा न्या. चंद्रचूड यांचा मुख्य आक्षेप होता. संस्कृती आणि नीतिमत्तेचे संस्कार पालक व शिक्षकांनी मुलांवर करायचे असतात. न्यायालयीन आदेशांनी ते अंगी बाणविता येत नाहीत, असे ते म्हणाले.न्या. चंद्रचूड म्हणाले की, लोक चित्रपटगृहांमध्ये मनोरंजनासाठी जातात. तेथे त्यांचे मनोरंजनच व्हायला हवे. न्यायालयाच्या या आदेशानंतर राष्ट्रगीतासाठी उभे राहिल्यास आपण देशद्रोही ठरू, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.लोकांनी देशभक्तीचे जाहीरपणे प्रदर्शन करण्याची काही गरज नाही, असे सांगत न्या. चंद्रचूड म्हणाले की, असेच सुरू राहिल्यास या ‘मॉरल पोलिसिंग’ला अंत राहणार नाही. उद्या राष्ट्रगीताचा अपमान होईल म्हणून लोकांनी टी-शर्ट व हाफपॅन्ट घालून चित्रपटाला जाऊ नये, असाही आदेश द्यावा लागेल. केंद्र सरकारतर्फे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयाच्या आधीच्या आदेशाचे समर्थन केले. तासाभराच्या सुनावणीनंतर सरन्यायाधीश मिस्रा यांनी आधीच्या आदेशातील सक्तीचा भाग वगळता येईल, असे संकेत दिले. मात्र त्याऐवजी सरकारच ध्वजसंहितेमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करून या गोष्टी का समाविष्ट करत नाही, असे त्यांनी सुचविले. त्यासाठी अ‍ॅटर्नी जनरलनी सरकारतर्फे तयारी दर्शविल्यानंतर पुढील सुनावणी ९ जानेवारीपर्यंत तहकूब केली गेली.

टॅग्स :Courtन्यायालय