शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये निवडणुका घ्या, लगेचच राज्याचा दर्जा द्या; पंतप्रधान म्हणाले वेळ येताच निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 10:33 IST

वेळ येताच निर्णय घेऊ; पंतप्रधानांचे काश्मिरी नेत्यांना आश्वासन

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घ्या, या प्रदेशाला लगेचच राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करा अशी मागणी काश्मीरी नेत्यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्यावर वेळ येताच केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल असे आश्वासन मोदी यांनी दिले.

राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केल्यानंतर तसेच जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर केंद्र सरकार प्रथमच काश्मीरी नेत्यांशी चर्चा करणार असल्याने गुरुवारच्या दिल्लीतील बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुपकार गटातील सर्व नेते या बैठकीला हजर होते. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख डॉ. फारुक अब्दुल्ला, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन, माकपचे नेते युसुफ तारिगामी, जम्मू-काश्मीर अपनी पार्टीचे नेते अल्ताफ बुखारी, जम्मू-काश्मीर काँग्रेसचे प्रमुख जी.ए. मीर, भाजपचे रवींद्र रायना, पँथर्स पार्टीचे भीमसिंह आदी नेते उपस्थित होते.  तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हेही हजर होते. 

काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करा : काँग्रेस

काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा द्या, विधानसभा निवडणुका घ्या, अधिवास व नोकऱ्यांची हमी द्या, काश्मीरी पंडितांचे पुनर्वसन करा, राजकीय कैद्यांची मुक्तता करा अशा पाच मागण्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केल्या. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर