शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय व्यावसायिकांच्या हितांचे तुम्हीच रक्षण करा, ‘आयएमए’चे पत्र,  वैद्यकीय आयोगास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 06:33 IST

द्यकीय व्यवसायाच्या हिताचे रक्षण करा, असे आवाहन ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) खासदारांना पाठविलेल्या पत्रात केले आहे. सध्याच्या आयएमएच्या जागी नवीन राष्टÑीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली : वैद्यकीय व्यवसायाच्या हिताचे रक्षण करा, असे आवाहन ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) खासदारांना पाठविलेल्या पत्रात केले आहे. सध्याच्या आयएमएच्या जागी नवीन राष्टÑीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एनएमसीच्या स्थापनेसाठी आणण्यात येत असलेल्या विधेयकाच्या मसुद्यास आयएमएने विरोध केला आहे.आयएमएचे अध्यक्ष के. के. अगरवाल यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकत्याच मंजूर केलेल्या एनएमसी विधेयकाच्या मसुद्यातील तरतुदींनी भारतातील वैद्यकीय व्यवसाय कोलमडून पडणार आहे. या विधेयकानुसार डॉक्टरांवर नोकरशहा आणि बिगर-वैद्यकीय प्रशासनाचे नियंत्रण येणार आहे. वास्तविक वैद्यकीय व्यवसाय सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. याची दखल घेऊन खासदारांनी त्यानुसार निर्णय घ्यायला हवा.अगरवाल यांनी सांगितले की, एनएमसीच्या स्थापनेनंतर वैद्यकीय क्षेत्राच्या चिंता वाढणार आहेत. याअंतर्गत वैद्यकीय व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियामक नेमला जाणार आहे. वैद्यकीय व्यवसायाचे व्यापक हित लक्षात घेऊन या विधेयकाचा फेरविचार करण्यात यावा, अशी विनंती आयएमएने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही गेल्या आठवड्यात केली होती.काय आहेत तरतुदी?वैद्यकीय व्यवसाय नियमनासाठी चार संस्था स्थापन करण्याची तरतूद आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचे नियमन, वैद्यकीय संस्थांचे मूल्यमापन, त्यांना अधिस्वीकृती व व्यवसाय करणाºयांची नोंदणी अशा जबाबदाºया त्यांच्यावर असतील.एमसीआय व एमसीआय कायद्यातील कलम १५ रद्द होईल. या कलमान्वये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी एमबीबीएस पदवी असणे ही किमान पात्रता आहे.आयएमए निवडणुकीद्वारे निवडली जाते. देशातील प्रत्येक डॉक्टर मतदार आहे. तसेच त्याला निवडणूक लढविण्याचा हक्क आहे. नव्या विधेयकात हे दोन्ही हक्क डॉक्टरांकडून हिरावून घेण्यात येणार आहेत.नव्या संस्थेवरील नेमणुकांचे सर्वाधिकार सरकारकडे जाणार आहेत. वैद्यकीय क्षेत्राशी संबंध नसलेल्या व्यक्तीही संस्थेवर घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टर