शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

Taj Mahal: "हिम्मत असेल तर ताजमहलला मंदिर बनवून दाखवा", मेहबूबा मुफ्तींचे भाजपला खुले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 16:53 IST

Taj Mahal: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीनंतर आता ताजमहालचे सर्वेक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ताजमहालच्या 22 बंद खोल्या उघडल्या पाहिजेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

Taj Mahal: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीनंतर आता ताजमहालचे सर्वेक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ताजमहालच्या 22 बंद खोल्या उघडल्या पाहिजेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या खोल्यांमध्ये हिंदू देवदेवतांच्या मूर्ती असण्याची शक्यता याचिकेतून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांनी यावरुन भाजपला मोठे आव्हान दिले आहे.

ताजमहालला मंदिर बनवून दाखवा"तुमच्यात हिम्मत असेल तर ताजमहाल आणि लाल किल्ल्याला मंदिर बनवून दाखवा, मग बघूया भारतात किती लोक ते बघायला येतील", असे थेट आव्हान पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी दिले आहे. "भाजप लोकांना रोजगार देऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. महागाई नियंत्रणात आणता येत नाही. देशाची संपत्ती विकली जात आहे. आज आपला देश बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ यांच्याही मागे गेला आहे. पण या लोकांना याची चिंता नाही. देशातील पैसा लुटून पळून गेलेल्यांना परत आणण्याऐवजी या लोकांना मुघल काळात बांधलेल्या मालमत्ता नष्ट करायच्या आहेत," अशी टीकाही त्यांनी केली.

ताजमहालच्या सर्वेक्षणाची मागणीताजमहालमध्ये हिंदूंच्या मूर्ती असल्याचा दावा करणारी याचिका लखनौ खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. यासोबतच ताजमहालचे सर्वेक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ताजमहालखाली शिवमंदिर असून इमारतीच्या 22 बंद खोल्यांमध्ये हिंदू देवदेवतांच्या मूर्ती असल्याचा दावा केला जात आहे, त्यामुळेच या खोल्या उघडण्याचा मुद्दा या याचिकेत मांडण्यात आला आहे. ज्ञानपवी मशिदीच्या सर्वेक्षणावरून देशात यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. आता ताजमहालवरूनही राजकारण सुरू झाले आहे. ज्ञानवापीचे सर्वेक्षण योग्य असून मंदिर पाडून येथे मशीद कशी बांधली, हे सत्य लोकांसमोर यावे, अशी भाजपची मागणी आहे.

टॅग्स :Taj MahalताजमहालMehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती