शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वाढण्यास ‘तबलिग’चा कार्यक्रमही कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 05:01 IST

केंद्र सरकार : राज्यसभेत केले निवेदन; बंदिस्त जागेत सामाजिक अंतराचा नियम पाळला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना साथ सुरू झाल्यानंतर विविध यंत्रणांनी इशारे देऊनही दिल्ली येथे मार्च महिन्यात आयोजिलेल्या तबलिग जमातच्या मेळाव्यामुळेही कोरोना विषाणूचा संसर्ग अनेकांना झाला, असे केंद्र सरकारने राज्यसभेत सांगितले.

यासंदर्भात शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत सांगितले की, तबलिग जमातीने दिल्लीमध्ये बंदिस्त जागेत भरविलेल्या मेळाव्यात फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात आले नव्हते. तसेच अन्य कोणत्याच प्रकारची काळजी घेतली नव्हती. त्यामुळे अनेक जणांना कोरोनाचा संसर्ग होण्यास हा कार्यक्रमही कारणीभूत ठरला.

तबलिग जमातने दिल्लीतील जामा मशिदीत मार्च महिन्यामध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातील काही हजार जण उपस्थित होते. त्यांच्यामुळे परस्परांना व त्यांच्या अनुयायांना कोरोनाचा संसर्ग झाला.तबलिग जमातच्या दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामुळे दिल्ली व अन्य राज्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला का, असा प्रश्न खासदार अनिल देसाई यांनी विचारला होता.

यासंदर्भात जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, कोरोना साथीमुळे लागू केलेले निर्बंध तोडून तबलिघी जमातचा मेळावा आयोजित केल्याप्रकरणी मौलाना साद कंधलवी आणि सहा जणांवर पोलिसांनी ३१ मार्चला एफआयआर नोंदविला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासह काही न्यायालयांनी तबलिघी जमातच्या सदस्यांविरोधात नोंदविलेले एफआयआर रद्द केले आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग पसरविल्याच्या आरोपातून त्यांची मुक्तता केली आहे.२३३ जणांना आतापर्यंत अटक2,361 जण तबलिग जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. 233 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तबलिग जमातचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद यांच्याविषयी तपास सुरू आहे. ९५६ विदेशी नागरिकांवर आतापर्यंत ५९ आरोपपत्रे दिल्ली पोलिसांनी दाखल केली आहेत. या कार्यक्रमाला ते सर्व हजर होते.केंद्राने या सर्वांचे व्हिसा रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या