शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसताहेत : सरसंघचालक; जागतिक शांतीसाठी जगाची आता भारतावर आशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 07:16 IST

मध्य प्रदेशात जबलपूर येथे संघाच्या दिवंगत नेत्या डॉ. उर्मिला जामदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित समारंभात भागवत बोलत होते.

जबलपूर : जगावरील तिसऱ्या महायुद्धाचा धोका अजूनही कायम आहे. या स्थितीत जागतिक शांतीसाठी संपूर्ण जगाची आशा आता भारतावर असल्याचे सांगून यात काही लोक अडथळे निर्माण करीत असल्याचे सरसंघचालक माेहन भागवत यांनी नमूद केले. भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचेही ते म्हणाले. मध्य प्रदेशात जबलपूर येथे संघाच्या दिवंगत नेत्या डॉ. उर्मिला जामदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित समारंभात भागवत बोलत होते.

सध्या युक्रेन-रशिया युद्ध असो अथवा इस्रायल-हमास यांच्यातील संघर्ष असो, यातून तिसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसू लागली आहेत. हे महायुद्ध नेमके कुठून सुरू होईल हे इतक्यात स्पष्ट नसले तरी सध्या सुरू असलेल्या संघर्षांच्या क्षेत्रातूनच याची ठिणगी पडू शकते, असे भागवत म्हणाले. यावेळी सरसंघचालक भागवत यांनी विज्ञानात जगाने साधलेली प्रगती आणि शस्त्रास्त्रांच्या विकासावरही भाष्य केले. 

मानवतेची सेवा हाच सनातन धर्ममानवतेची सेवा करणे हाच सनातन धर्म असून हेच हिंदुत्वातही असते. याच हिंदुत्वात जगाला मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य असल्याचे भागवत म्हणाले. भारतीय ग्रंथांत लिखीत स्वरुपात मांडला जाण्याआधीच हिंदू शब्द अस्तित्वात आला होता. जनतेत जाहीरपणे या शब्दाचा वापर श्री गुरुनानक देवजींनी केला होता, असेही ते म्हणाले.

विज्ञानाच्या लाभापासून अजूनही गरीब वर्ग वंचित

विज्ञानाच्या क्षेत्रात जगाने खूप प्रगती केली; परंतु त्याचे लाभ अजूनही जगातील गरिबांपर्यंत पोहोचलेले नाहीत. दुसरीकडे जगाचा विनाश करणारी शस्त्रास्त्रे मात्र जागोजाग पोहोचत आहेत. 

ग्रामीण भागात काही आजारांवरील औषधे भलेही मिळत नसतील, परंतु देशी कट्टा मात्र येथे सहज पोहचतो. एकीकडे ही स्थिती असताना पर्यावरणाकडील दुर्लक्षाकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत