नवी दिल्ली/अहमदाबाद : देशात स्वाईन फ्लूचा कहर वाढतच आहे. या आजाराने मंगळवारी आणखी ४३ जणांचा बळी घेतला. त्यांच्या मृत्यूबरोबरच दोन महिन्यात स्वाईन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून ११५८ वर पोहोचली. दरम्यान, स्वाईन फ्लूची लागण होण्याच्या भीतीने अहमदाबाद येथील दहा हजारावर वकिलांनी सामूहिक सुटी घेण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार यंदा २ मार्चपर्यंत देशभरात ११५८ लोकांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे, तर २१,४१२ रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत.
अहमदाबादमधील जिल्हा, ग्रामीण, महानगर, शहर आणि अन्य न्यायालयांतील जवळपास दहा हजारावर वकिलांनी स्वाईन फ्लूच्या भीतीने ३ मार्च ते ७ मार्च या काळात कामावर न येण्याचा निर्णय घेतला आहे.