शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

मिठाई नाकारली, सीमेवर गोळीबार

By admin | Updated: July 19, 2015 02:40 IST

सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरून भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव निर्माण झाला असतानाच पाकिस्तानी सैनिकांनी ईदनिमित्त सीमा सुरक्षा दलातर्फे (बीएसएफ) देण्यात

अमृतसर/जम्मू : सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरून भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव निर्माण झाला असतानाच पाकिस्तानी सैनिकांनी ईदनिमित्त सीमा सुरक्षा दलातर्फे (बीएसएफ) देण्यात आलेली मिठाई स्वीकारण्यास नकार दिला. उभय देशांच्या सीमा सुरक्षा दलातर्फे जम्मूत आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि पंजाबच्या अमृतसरमध्ये अटारी वाघा सीमेवर सणउत्सवाला एकमेकांना मिठाई वाटण्याची परंपरा आहे. अमृतसरमध्ये बीएसएफचे उपमहासंचालक एम.एफ. फारुकी यांनी सांगितले की, वाघा सीमेवर आम्ही मिठाई दिली; परंतु दुसऱ्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही दरवेळी ईदला मिठाई देतो. आज पाकी सैनिकांनी मिठाई घेतली नाही. आंतरराष्ट्रीय सीमेवर मात्र बीएसएफने आपल्या समकक्षांना मिठाई दिली नाही. दलाच्या वरिष्ठ कमांडरने दिल्लीतील मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाककडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा निषेध नोंदविण्यासाठी मिठाईचे वाटप करण्यात आले नाही. (वृत्तसंस्था)चोराच्या उलट्या बोंबानवी दिल्ली- पाकिस्तानला भारताशी चांगले संबंध ठेवायचे आहेत व आमचे त्यासाठी नेहमीच प्रयत्न सुरू असतात. दोन्ही बाजूंची इच्छा असेल तर द्विपक्षीय संबंधात मिठाचा खडा ठरणाऱ्या समस्या सहज सुटू शकतात,असे प्रतिपादन भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी शनिवारी केले.ईदेच्या पर्वावर बासित यांनी येथील फतेहपुरी मशिदीच्या इमामांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, उभय देशांमधील संबंधात सुधारणा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. दोन्ही देशांची इच्छाशक्ती असल्यास गरिबी, निरक्षरता आणि आरोग्यविषयक समान मुद्यांवर नक्कीच तोडगा काढता येईल. पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, अग्निबाणांचा माराजम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारी काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी छोट्या अग्निबाणांचा मारा करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मागील १२ तासातील शस्त्रसंधी उल्लंघनाची ही दुसरी घटना आहे.पाकिस्तानी सैन्याने पुंछ सेक्टरमध्ये शाहपूर केरनी भागात लष्कराच्या अनेक चौक्यांवर कुठल्याही चिथावणीशिवाय गोळीबार केला. दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी सुरू झालेला हा गोळीबार अद्याप थांबलेला नसून भारतीय जवानांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. शुक्रवारी रात्री उशिरा सुद्धा पाकी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात कुठलीही जीवहानी झाल्याचे वृत्त नाही. या महिन्यात सीमेपलिकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. गेल्या १५ जुलैला पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू जिल्ह्णात केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात एक महिला ठार तर सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांसह सहा जण जखमी झाले होते. तत्पृूर्वी ९ जुलैला उत्तर काश्मीरच्या आघाडीच्या चौक्यांवर गोळीबारात एक जवान शहीद झाला होता.पुन्हा पाकिस्तान, इसिसचे झेंडे फडकलेश्रीनगर : ईदेच्या नमाजानंतर राज्याच्या अनंतनाग जिल्ह्णासह आणखी काही भागात दगडफेक करणारे युवक आणि सुरक्षा दलादरम्यान चकमकी उडाल्या. याशिवाय शहरातील जुन्या बरजुल्ला परिसरात पाकिस्तान आणि इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरियाचे (इसिस) झेंडे फडकविण्यात आले. दगडफेकीच्या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी सुद्धा काही फुटीरवाद्यांनी पाकिस्तान, लष्कर-ए-तय्यबा आणि इसिसचे झेंडे फडकविल्यानंतर काही युवक आणि सुरक्षा जवानांमध्ये बाचाबाची झाली होती.