शहरं
Join us  
Trending Stories
1
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
2
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
4
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
5
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
6
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
7
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
9
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
10
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
11
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
12
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
13
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
14
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
15
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
16
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
17
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
18
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
19
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
20
"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"

"माज-अहंकार फार टिकत नाही, इतिहास साक्ष देतो की..."; स्वाति मालिवाल यांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:49 IST

Swati Maliwal slams Arvind Kejriwal on AAP Loss, Delhi Assembly Elections 2025: सोशल मीडियावर द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाचा फोटो शेअर अरविंद केजरीवाल यांच्यावर साधला निशाणा

Swati Maliwal slams Arvind Kejriwal on AAP Loss, Delhi Assembly Elections 2025 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने जोरदार मुसंडी मारत सत्तास्थापना केली. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपाचा मुख्यमंत्री बसला. याचीच पुनरावृत्ती दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाली. गेली २७ वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या भाजपाने अखेर दिल्ली जिंकली आणि आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला. ७० विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने बहुमतापेक्षाही खूप मोठी झेप घेत साऱ्यांनाच अवाक् केले. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही पराभवाचा धक्का बसला. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. आपचे अनेक बडे दिग्गज नेते पराभूत झाले. दारूण पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

"माज आणि अंहकार कुणाचाही जास्त काळ टिकू शकत नाही. रावणाचाही अहंकार जास्त काळ टिकला नाही, हे तर केवळ अरविंद केजरीवाल आहेत. इतिहास साक्ष आहे की जेव्हा एखाद्या महिलेशी कुणी वाईट वर्तणूक केली असेल तर देवाने त्यांना शिक्षा दिली आहे. आज दिल्ली एका अर्थाने कचऱ्याच्या डब्ब्याप्रमाणे झालीय. दिल्लीच्या रस्त्यांवर कचरा पडलेला दिसतोय. लोकांना काही ठिकाणी घाणेरडे पाणी दिलंय जातंय किंवा काही ठिकाणी पाणीच मिळत नाहीये. नाले तुंडूब भरून वाहताना दिसतायत. हवेचे प्रदुषणदेखील प्रचंड वाढलेलं आहे. यमुना नदी स्वच्छ झालेली नाहीये. दिल्लीकर या सर्व समस्यांना कंटाळले होते, त्यामुळे त्यांनी आप आणि केजरीवाल यांच्या विरोधात मतदान केले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे अरविंद केजरीवाल स्वत:च्या मतदारसंघातील पराभवदेखील रोखू शकले नाहीत," अशा शब्दांत स्वाति मालीवाल यांनी आप व केजरीवाल यांच्या पराभवावर भाष्य केले.

तसेच, निवडणुकीचे कल हाती येऊ लागले असतानाच त्यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्टदेखील केली होती. त्यांनी महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंग दाखवणारं एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. या पोस्टच्या माध्यमातून स्वाति मालिवाल यांनी हेच सुचवलं होतं की, इतिहासातदेखील महिलेशी वाईट वर्तणूक करणाऱ्यांचे गर्वहरण झाले होतं. यावेळीही दिल्ली निवडणुकीत तेच झालंय.

दरम्यान, आपचे दोन दिग्गज पराभूत झाले. भाजपाच्या प्रवेश साहिब सिंग वर्मा यांनी अरविंद केजरीवालांना ३,१८६  मतांनी पराभूत केले. तर मनीष सिसोदिया यांना जंगपुरा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. भाजपाचे तरविंदर सिंग मारवा यांनी ६०० हून जास्त मतांनी विजय मिळवला.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Arvind Kejriwalअरविंद केजरीवालElectionनिवडणूक 2024AAPआप