तरुणाचा संशयास्पद मृत्यू
By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST
अपघाताचा गुन्हा : नातेवाईकांनी केला हत्येचा आरोप
तरुणाचा संशयास्पद मृत्यू
अपघाताचा गुन्हा : नातेवाईकांनी केला हत्येचा आरोप नागपूर : भरधाव मारुती कार उलटल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला तर, दोन गंभीर जखमी झाले. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला. आकाश संतोष दुबे (वय २२, रा. गोधनी रोड) असे मृताचे नाव आहे. राहुल रविंदनसिंग ठाकूर (वय २२, रा. इंगोले लेआऊट मिनीमातानगर) आणि श्याम ऊर्फ सोहन पंडितराव कुळे (वय ३५, रा. झिंगाबाई टाकळी) अशी जखमींची नावे आहेत. मात्र, हा अपघात नसून, आकाश दुबेची हत्या झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन केला आहे.मिनी मातानगर (गोधनी) येथे राहाणारा आकाश दुबे बुधवारी रात्री आपल्या परिवारासह घरी बसला होता. रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास त्याला एक फोन आला. मित्राचा फोन असल्याचे सांगून आकाश घराबाहेर पडला. रात्री ११.३० वाजले तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे आकाशच्या आजोबाने त्याला फोन केला. काही वेळेतच घरी येतो, असे यावेळी आकाशने आजोबाशी बोलताना सांगितले. राहुल ठाकूर आणि सोहन कुळे या दोघे सोबत असल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे परिवारातील सदस्य झोपले. पहाटे तीनच्या सुमारास सोहनचा भाऊ आकाशच्या घरी आला. त्याने कोराडीजवळ अपघात झाल्याचे सांगितले. त्यामुळे आकाशच्या परिवारातील सदस्य पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी त्यांना मेयोत पाठविले. मेयोत पोहचले असता आकाशचा मृत्यू झाल्याचे दुबे कुटुंबीयांना कळले. कोराडी पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याच्या राहुलच्या तक्रारीवरून सोहन कुळेविरुद्ध गुन्हा दाखल केला.----जोड आहे....