शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

‘त्या’ विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द; प्राध्यापकांचा पदत्याग

By admin | Updated: January 22, 2016 03:46 IST

दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येवरून हैदराबाद विद्यापीठात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आणि वाढत्या दबावापुढे नतमस्तक होऊन विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने दिवंगत रोहितसह

हैदराबाद : दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येवरून हैदराबाद विद्यापीठात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आणि वाढत्या दबावापुढे नतमस्तक होऊन विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने दिवंगत रोहितसह सर्व पाचही विद्यार्थ्यांचे निलंबन तत्काळ रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. तथापि, कुलगुरू अप्पा राव पोडिले यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा आणि हे आंदोलन आता देशव्यापी करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. दरम्यान, केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी केलेल्या कथित असत्य कथनाच्या निषेधार्थ विद्यापीठातील १३ दलित प्राध्यापकांनी प्रशासकीय पदांचा त्याग केला आहे.पाच विद्यार्थ्यांचे निलंबन तत्काळ मागे घेण्याचा निर्णय कार्यकारी परिषदेच्या तातडीने बोलावण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आणि हा निर्णय लगेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना कळविण्यात आला असल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले.स्मृती इराणी यांनी दिलेले स्पष्टीकरण असत्य व दिशाभूल करणारे आहे, असा आरोप करून हैदराबाद विद्यापीठातील एससी/एसटी टीचर्स अ‍ॅण्ड आॅफिसर्स फोरमच्या सदस्यांनी आपल्या ‘प्रशासकीय जबाबदारी’चा त्याग करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे हे आंदोलन देशभरात पसरविण्याचा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.‘विद्यापीठातील दलित विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेणाऱ्या कार्यकारी परिषदेच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी एक वरिष्ठ दलित प्राध्यापक असल्याचे सांगून स्मृती इराणी यांनी सत्याचा विपर्यास केला आहे. वास्तविक विपिन श्रीवास्तव हे ‘सवर्ण जातीचे’ प्राध्यापक या उपसमितीचे अध्यक्ष होते,’ असे विद्यापीठाच्या दलित (एससी/एसटी) विभागाच्या सदस्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.‘हैदराबाद विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत एकाही दलित प्राध्यापकाचा समावेश नसणे ही दुर्दैवी बाब आहे. प्रमुख वॉर्डन हा दलित असणे हा योगायोग आहे आणि त्याने पाच विद्यार्थ्यांना (रोहितसह) निलंबित करण्याच्या वरून आलेल्या आदेशाचे केवळ पालन केले आहे. हा मुद्दा चिघळण्याला आणि रोहित वेमुलाच्या आत्महत्येला निश्चितच इराणी आणि केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय हेच जबाबदार आहेत,’ असेही दलित प्राध्यापकांच्या या फोरमने स्पष्ट केले.विद्यार्थ्यांचे निलंबन तत्काळ मागे घेण्याची आणि विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले गुन्हेही रद्द करण्याची मागणी करून या फोरमने विद्यार्थी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे. >अभाविपला हवी चौकशीरोहित वेमुला आत्महत्येची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी अभाविपचा नेता नंदनम कुमार याने केली आहे. रोहितला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल कुमारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेडकर स्टुडंटच्या सदस्यांनी व रोहितने आपल्यावर हल्ला केल्याचे आपण खोटे सांगितल्याचा कुमार याने इन्कार केला.>केजरीवालांचा इराणींवर हल्लाबोलदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी हैदराबाद येथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. केंद्र सरकार जातीयवादी राजकारण खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. इराणींनी बुधवारी दिलेले निवेदन हे या मुद्याला जातीय मुद्दा बनविण्याच्या प्रयत्नाचाच एक भाग आहे आणि त्यासाठी त्यांनी माफी मागावी. रोहित अतिशय हुशार विद्यार्थी होता. तो दलित असला तरी राखीव कोट्यामधून आलेला नव्हता, तर गुणवत्तेवर त्याची निवड झाली होती. अशा हुशार विद्यार्थ्याने आत्महत्या करणे ही संपूर्ण देशासाठी आणि समाजासाठी शरमेची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.>इराणी, दत्तात्रत यांना बडतर्फ करण्याची मागणीरोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रय यांना तत्काळ मंत्रिपदावरून बडतर्फ करण्याची मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.इराणी या अभाविप नेत्याला वाचविण्यासाठी खोटे बोलत आहेत. चुकीची माहिती देऊन त्या देशाची दिशाभूल करीत आहेत. रोहितसह अन्य विद्यार्थ्यांवरील अन्यायाला त्या उचित ठरवित आहेत. खोटे बोलून त्यांनी अक्षम्य गुन्हा केला आहे. एक खोटे लपविण्यासाठी अनेकदा खोटे बोलल्या आहेत, असा आरोप सुरजेवाला यांनी केला.