शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी जनावरांच्या खरेदी-विक्री बंदीच्या अधिसूचनेला स्थगिती

By admin | Updated: July 11, 2017 18:13 IST

कत्तलीसाठी जनावरांच्या खरेदी-विक्री बंदीच्या अधिसूचनेला सुप्रीम कोर्टाने मंगळवारी तीन महिन्यांची स्थगिती दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली. दि. 11- कत्तलीसाठी जनावरांच्या खरेदी-विक्री बंदीच्या अधिसूचनेला सुप्रीम कोर्टाने मंगळवारी तीन महिन्यांची स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत मद्रास हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. तसंच अधिसूचनेतील नियमांमध्ये बदल करून सरकार ती नव्याने जारी करत नाही तोपर्यंत स्थगिती कायम राहील असंही कोर्टाने सांगितलं आहे. कत्तलीसाठी जनावरांच्या खरेदी विक्रीच्या अधिसूचनेला स्थगिती देत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दणका एकप्रकारे दणका दिला आहे.  
 
गोवंश हत्या रोखण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २३ मे रोजी अधिसूचना जारी केली होती तसंच काही नियम जाहीर केले होते. त्यानुसार कत्तलीसाठी बाजारातून जनावरांची खरेदी-विक्री करायला सरकारने बंदी घातली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात मद्रास हायकोर्टात याचिका करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती दिली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती.  सुप्रीम कोर्टात मंगळवारी झालेल्या सुनावणीत मद्रास हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. 
 
आणखी वाचा 
राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कठीण - राजेंद्र सिंह
शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पूर यांचा जवळचा संबंध - संजीव मेहता
कर्जमाफी नव्हे कायमचे कर्जमुक्त करायचेय - गिरीष महाजन
 
"केंद्र सरकार अधिसूचनेतील नियम सध्या लागू करणार नाही कारण या अधिसूचनेवर अनेक राज्यांनी आक्षेप नोंदवला आहे तसंच काही सूचनाही केल्या आहेत. त्यावर सध्या विचार सुरू आहे. तसंच नियम बदलण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ लागेल.  म्हणूनच नियमात बदल केल्यानंतर सरकार नव्याने अधिसूचना जारी करेल, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे. 
 
"केद्र सरकारचे नवे नियम लागू झाल्यावर त्यांना कोणीही कोर्टात आव्हान देऊ शकतं, असं मंगळवारी सुप्रीमी कोर्टाने सांगितलं.
 
केंद्र सरकारने केलेल्या या बंदीला सर्वसामान्यांसह राजकीय नेत्यांनीही मोठा विरोध केला आहे. या प्रकरणासाठी केरळमध्ये विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं होतं. या अधिवेशनात आमदारांनी बीफ खाऊन हजेरी लावली होती. तसंच आयआयची चेन्नईमध्ये या निर्णयाविरोधात बीफ फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं.