शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

उत्तर प्रदेशातील आश्रमात २ साधूंचा संशयास्पद मृत्यू; विषप्रयोगाच्या आरोपानं गूढ वाढलं

By कुणाल गवाणकर | Updated: November 21, 2020 19:53 IST

साधूंच्या मृत्यूची माहिती पसरताच राज्यात खळबळ; पोलिसांकडून तपास सुरू

मथुरा: उत्तर प्रदेशातल्या मथुरेतील गोवर्धनमधील जंगलात असलेल्या आश्रमात दोन साधूंचे मृतदेह आढळून आले आहेत. या साधूंच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. साधूंच्या मृत्यूची माहिती समजताच परिसरात खळबळ माजली. डीएम, एसएसपीसह पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. एका साधूंची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आश्रमात असलेल्या गायीच्या दूधापासून चहा प्यायल्यानंतर ही घटना घडल्याचं समजतं. विष देऊन हत्या करण्यात आल्याचा आरोप एका साधूंच्या भावानं केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवर्धनच्या गिरीराज बागेच्या मागे तीन साधू एका वर्षापासून आश्रम तयार करून राहत होते. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास दोन साधूंच्या मृत्यूची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे एकच खळबळ माजली.गोपाल दास आणि श्याम सुंदर दास अशी मृत्यूमूखी पडलेल्या दोन साधूंची नावं आहेत. तर रामबाबू दास यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विष देऊन साधूंची हत्या करण्यात आल्याचा आरोप गोपाल दास यांचे भाऊ टीकम यांनी केला. आश्रमातून विषारी औषधांचा वास येत असल्याचा दावादेखील त्यांनी केला. या प्रकरणात चित्रीकरण करण्यात येईल अशी माहिती एसएसपींनी दिली.