शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sushma Swaraj Death: फॉरेन पॉलिसी मॅगेझीनच्या ग्लोबल थिंकर्सच्या यादीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 04:03 IST

ट्विटटर या माध्यमाचा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अतिशय उत्तमपणे वापर केल्याबद्दल २०१६ च्या ग्लोबल थिंकर्सच्या यादीत घेतले होते.

आंतरराष्ट्रीय राजकारणावर आधारित फॉरेन पॉलिसी या मॅगेझीनने तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे नाव ट्विटटर या माध्यमाचा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अतिशय उत्तमपणे वापर केल्याबद्दल २०१६ च्या ग्लोबल थिंकर्सच्या यादीत घेतले होते. डिसिजन मेकर्सच्या श्रेणीत स्वराज यांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते.मॅगेझीनने लिहिले होते की, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सौदी अरेबियातील १० हजार भारतीय मजुरांच्या उपासमारीची समस्या ट्विटरवर मांडली होती. यानंतर सोशल मीडियावर मोठे आंदोलन उभे राहिले. स्वराज यांनी कामगारांची स्थिती, भारतीय दूतावासाकडून त्यांना दिली जाणारी खाण्यापिण्याची मदत, त्यांचे वेतन आणि त्यांना भारतात आणून सोडण्याबाबतच्या अनेक समस्यांची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. यामुळेच हे कामगार सुखरुपणे मायदेशी परतू शकले होते. हे पहिल्यांदाच घडलेले नव्हते.येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सुद्धा सुषमा स्वराज यांनी याचप्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत केली होती. ट्विटरवर खूप सक्रिय असलेल्या सुषमा स्वराज यांना या मॅगझीनने ‘दी कॉमन ट्विटपल्स लीडर’ असे टोपणनावही दिले होते. मॅगझीनमध्ये त्यांचे नाव आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे आभार मानले होते. आमच्या मेहनती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे नाव ग्लोबल थिंकर्सच्या यादीत सामील झाले आहे.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज