शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Sushma Swaraj Death: बांगडीवालीपुढेच गुडघे टेकले होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 06:46 IST

तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनाही कणखरपणे खडेबोल सुनावणाऱ्या सुषमा स्वराज यांचा खंबीरपणा उभ्या जगाने अनुभवला आहे.

भारतावर उठसूठ तोंडसुख घेत आरोपांची फैरी झाडणारे पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनाही कणखरपणे खडेबोल सुनावणाऱ्या सुषमा स्वराज यांचा खंबीरपणा उभ्या जगाने अनुभवला आहे. सतत आक्रमणाची भाषा वापरुन भारत पाकिस्तानला धमकावत आहे, असा आरोप करीत आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, असे वक्तव्य मुशर्रफ यांनी केल्यानंतर सुषमा स्वराज यांनी रणरागिणी होत मुशर्रफ यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता.बांगड्या हे दुर्बलपणाचे लक्षण आहे, असे मुशर्रफ यांना वाटत असले तरी बांगड्याची ताकद काय असते, हे पाकिस्तानला चांगलेच ठाऊक असेल. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानने तत्कालीन लष्कर प्रमुख जन. ए. ए. के. नियाझी यांना एका बांगडीवालीपुढेच ( तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी) गुडघे टेकावे लागले होते, अशी आठवण मुशर्रफ यांना करुन दिली. सीमापार दहशतवाद, पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणारे पाठबळ, द्विपक्षीय संबंध आणि अफगाणिस्तानमधील स्थितीवर सडेतोड भाष्य करतांना त्या म्हणाल्या होत्या की, पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या कुरापती थांबणार नाहीत. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा बीमोड करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे; त्याआधी अफगाणिस्तानमधील दहशतवादाचा नि:पात होणे जरुरी आहे. अफगाणिस्तावमधील युद्ध हे इस्लाम वा अफगाणविरुद्ध नाही. तेथील दहशतवादाविरुद्धचा हा लढा आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील दहशतवादाविरुद्ध युद्ध जिंकायलाच हवे. अन्यथा दहशतवादाविरुद्ध लढा देणा-या देशांवर दूरगामी परिणाम होतील.वाजपेयी-मुशर्रफ यांच्या भेटीबाबत त्या म्हणाल्या की, जम्मू-काश्मिरमधील दहशतवादाला पाठिंबा देणे पाकिस्तान जोवर थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी फलदायी चर्चा होणे अशक्य आहे. तेव्हा ‘युद्ध हवे की शांतता’ हे मुशर्रफ यांनीच ठरवावे, असे सुषमा स्वराज यांनी ऑक्टोबर २००१ मध्ये केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असताना ठणकावले होते.>महिला आरक्षणाबाबत हे होते मतमहिला आरक्षणाबद्दल आपल्याला काय वाटते या प्रश्नाला उत्तर देताना स्वराज म्हणाल्या होत्या की, ३३ टक्के आरक्षणाला मी न्यायसंगत आणि तर्कसंगतसुद्धा मानते. लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेदाला काही अर्थच उरत नाही. हे विधेयक सर्वानुमते पारित होत नसेल, तर बहुमताने पारित करायला हवे. ही संविधानातील सुधारणा असल्याने दोनतृतीयांश बहुमत मिळायला हवे. पोखरणवरसुद्धा सर्वानुमती झाली नव्हती.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज