शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
2
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
3
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
4
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
5
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
6
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
7
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
8
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
9
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
10
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
11
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
12
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
13
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
14
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
15
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
16
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
17
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
18
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
19
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

Sushant Singh Rajput Death Case: धमक्या मिळत असल्याचा सुशांतच्या कुटुंबीयांचा आरोप

By राजा माने | Updated: August 13, 2020 05:26 IST

मुंबई पोलिसांच्या तपासावरही घेतली शंका

पाटणा : आम्हाला काही जणांकडून धमक्या मिळत आहेत तसेच आमची प्रतिमा मलिन करण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आत्महत्या केलेला अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबीयांनी नऊ पानी निवेदनात केला आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येचा मुंबई पोलिसांनी सखोल तपास न करता काही प्रतिष्ठित लोकांना या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही यात केला आहे.सुशांत व त्याच्या कुटुंबीयांमध्ये सलोख्याचे संबंध नव्हते असा सूर शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या संपादकीयात लावला होता. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनी निवेदनात म्हटले आहे की, सुशांतच्या चार बहिणींपैकी सर्वात थोरली विदेशात स्थायिक आहे. त्याची दुसरी बहिण भारताच्या महिला क्रिकेट संघातून खेळत होती. तिसऱ्या बहिणीने कायदा शाखेचे शिक्षण घेतले आहे. सुशांतच्या चौथ्या बहिणीने फॅशन डिझाइनिंगचा कोर्स केला होता. या चार बहिणींनंतरचे पाचवे अपत्य म्हणजे सुशांतसिंह. सुशांतच्या कुटुंबीयांनी कधीही कोणाकडून काही घेतले नाही. सुशांतच्या आईचे अकाली निधन झाले, सुशांतचा हिंदी चित्रपटसृष्टीत जम बसला. गेल्या आठ-दहा वर्षांत घडलेल्या घटनांचे लोक आपल्याला हवा तसा अर्थ काढू लागले आहेत.सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे इतर कथित नातेवाईक प्रसारमाध्यमांना उलटसुलट माहिती देत आहेत. त्याच्याशी जवळकीच्या कहाण्या रचून सांगत आहेत. सुशांतचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. त्याच्या आजूबाजूला जमलेल्या लोकांनीच त्याला जाळ््यात अडकवले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना यातना होईल, अशाच गोष्टी घडविण्यात आल्या. त्याला मनोरुग्ण ठरविले. त्याच्या मृतदेहाची छायाचित्रे सर्वच माध्यमांवर झळकविण्यात आली, असे या निवेदनात म्हटले आहे.प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्नसुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात त्याच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यावेळी या पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप या अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात केला आहे. त्यात म्हटले आहे की, सुशांतसिंहचे वडील व चार बहिणी यांना धमक्या देण्यात येत आहेत. तसेच सुशांतसिंहची प्रतिमा मलिन करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती