शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput Death Case: महाराष्ट्राने तपासास सहकार्य केलेले नाही; बिहार सरकारचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 06:42 IST

Sushant Singh Rajput Death Case: चक्रवर्ती हिने तिच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा मुंबईला हलवण्यात यावा अशी याचिकेद्वारे मागणी केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकार व चक्रवर्ती यांचे म्हणणे सादर झाले.

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येबाबत महाराष्ट्र पोलिसांनी राजकीय दडपणामुळे गुन्हा (एफआयआर) नोंदवला नाही की प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाटणा पोलिसांना सहकार्य केले नाही, असे बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयाला गुरुवारी सांगितले.बिहार सरकार आणि रिहा चक्रवर्ती यांनी या न्यायालयात आपापले म्हणणे लेखी सादर केले. राजपूत याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल चक्रवर्तीविरुद्ध पाटण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. चक्रवर्तीने तिच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा मुंबईला हलवण्यात यावा अशी याचिकेद्वारे मागणी केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकार व चक्रवर्ती यांचे म्हणणे सादर झाले.रिहा चक्रवर्ती म्हणाली, बिहार सरकारच्या वतीने तपास केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआय) पाठवणे हे या प्रकरणात राज्याच्या अधिकार क्षेत्राबाहेरचे आहे. सुशांतसिंह राजपूत हा गेल्या १४ जून रोजी मुंबईत बांद्रा उपनगरमध्ये अपार्टमेंटमध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. तेव्हापासून मुंबई पोलीस या आत्महत्येची चौकशी करत आहेत. बिहार सरकारच्या वतीने वकील केशव मोहन यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘हे तर स्पष्टच आहे की, महाराष्ट्रातील राजकीय दडपणामुळे मुंबई पोलिसांनी ना गुन्हा दाखल केला ना वेगाने चौकशी करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी बिहार पोलिसांना सहकार्य केले.’’  वरिष्ठ वकील मैंदर सिंह म्हणाले की, या निवेदनात रिहाच्या याचिका स्थलांतरीत करण्याच्या सध्याच्या याचिकेत काहीही म्हटलेले नसल्यामुळे ती फेटाळली जावी किंवा निकाली काढली जावी. प्रकरणाच्या सध्याच्या परिस्थितीत सीबीआयने प्रकरण हाती घ्यावे आणि तपास वेगाने करावा यात कोणताही अडथळा येऊ दिला जाऊ नये, असे बिहार सरकारने म्हटले. रिहा चक्रवर्ती गुन्हा दाखल करावा किंवा तो बदली करून घ्यावा या दोन्ही बाबी बिहार सरकारच्या अधिकारक्षेत्राबाहेरच्या आहेत, असे रिहा चक्रवर्ती हिने म्हटले. 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती