शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

'Surgical Strike' मधील शिलेदार शहीद, तीन दहशतवाद्यांना संपवून वीर जवान धारातिर्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 14:18 IST

लान्स नायक संदीप सिंह यांना 5 वर्षांचा मुलगा आहे. सिंह हे 2016 च्या सर्जिकल स्ट्राईकच्या टीमचा हिस्सा होते. 

श्रीनगर : दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो लान्स नायक संदीप सिंह हे सोमवारी एका चकमकीदरम्यान  शहीद झाले. मात्र, शहीद होण्यापूर्वी सिंह यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना वाचवत तीन दहशतवाद्यांना ठार करत साहसी वृत्ती दाखविली. 

पंजाबच्या गुरुदासपूरचे लान्स नायक संदीप सिंह रहिवासी होते. संदीप सिंह यांनी ४ पॅरा कमांडो पथकांच्या साथीने तंगधार सेक्टरमधील गगाधारी भागात दहशतवाद्यांची शोध मोहिम सुरु केली होती. ऑपरेशन ऑलआऊटदरम्यान त्यांना काही संदिग्ध हालचाली दिसून आल्या. यानंतर त्यांच्या टीमने पुढे जाऊन दहशतवाद्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला सिंह यांच्या पथकाने जोरदार प्रत्यूत्तर दिले. यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले. मात्र, दहशतवाद्यांना झाडलेल्या काही गोळ्या सिंह यांना लागल्याने ते जखमी झाले. यादरम्यान, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही हल्ल्यातून वाचविले. जखमी अवस्थेतच त्यांनी दहशतवाद्यांवर गोळ्या झाडणे सुरुच ठेवले. यावेळी दहशतवाद्यांनी झाडलेली एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली आणि लान्सनायक सिंह शहीद झाल्याचे लष्कराच्या सुत्रांनी सांगितले. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे सापडली आहेत.

लान्स नायक संदीप सिंह यांना 5 वर्षांचा मुलगा आहे. सिंह हे सर्जिकल स्ट्राईकच्या टीमचा हिस्सा होते. 

उत्तर काश्मीरमधील कुपवाडाच्या तंगधारमध्ये रविवारी दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता. यावेळी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. तर तीन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या दहशतवाद्यांची शोधमोहीम लष्कराने हाती घेतली होती. यानंतर सोमवारी तीन जणांना ठार करण्यात आले. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान