मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची ओपन हार्ट सर्जरी बुधवारी यशस्वी झाली. सव्वासहा तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. सध्या लालूप्रसाद यांची प्रकृती स्थिर आहे. पुढचे तीन ते चार दिवस त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात येणार असून त्यांची प्रकृती सामान्य व्हायला अजून एक आठवडा लागणार असल्याचे एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ. रमाकांत पांडा यांनी सांगितले.लालूप्रसाद यादव यांना रविवारी रात्री एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी ९:४५ वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया ४ वाजता संपली. २० डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यांच्या हृदयाच्या चार झडपांपैकी एक झडपेचे कार्य योग्यरीत्या होत नव्हते. आज शस्त्रक्रियेदरम्यान त्यांची कार्य न करणारी झडप बदलण्यात आली असून, तिथे कृत्रिम झडप बसवण्यात आली आहे. यासह महारोहिणीच्या कार्यामध्ये येत असलेले अडथळे देखील काढण्यात आले आहेत, असे डॉ. पांडा यांनी सांगितले.
लालूप्रसाद यादवांवर शस्त्रक्रिया
By admin | Updated: August 28, 2014 03:35 IST