शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्यात मोहन भागवत यांचे आज आगमन

By admin | Updated: March 24, 2016 23:30 IST

सुरगाणा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आज (दि.२५) सुरगाण्यात विवाह समारंभासाठी येत असल्याने त्यांच्या आगमनाची मोठी उत्सुकता वर - वधू च्या कुटूंबासह तालुक्यातील आर एस एस च्या पदाधिकारी व कार्यकयांना लागून राहिली आहे.

सुरगाणा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आज (दि.२५) सुरगाण्यात विवाह समारंभासाठी येत असल्याने त्यांच्या आगमनाची मोठी उत्सुकता वर - वधू च्या कुटूंबासह तालुक्यातील आर एस एस च्या पदाधिकारी व कार्यकयांना लागून राहिली आहे.या दूर्गम आदिवासी तालुक्यात येण्याचे कारण म्हणजे त्यांचा अतिशय जवळचा व आचारी असलेला कार्यकर्ता देविदास यशवंत कामडी हा सुरगाणा तालुक्यातील मोठी घोडी या गावचा रहिवासी असून या देविदासचा विवाह तालुक्यातील तोरणडोंगरी येथील मालती गावित हिचेशी आज (दि.२५) रोजी दुपारी संपन्न होणार आहे. देविदासच्या आग्रहाच्या निमंत्रणामुळे सरसंघचालक वधू - वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी या विवाहास उपस्थित राहणार आहेत. प्रथम ते प्रतापगड येथे सकाळी काही वेळ थांबून संघाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते तोरणडोंगरी येथे विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी रवाना होणार असल्याचे समजते. आर.एस.एस.चे एखादे प्रमुख तेही विवाह समारंभासाठी तालुक्यात येण्याची हि बहुधा पिहलीच वेळ असावी. त्यामुळे आर.एस.एस. चे कार्यकर्ते तसेच पोलिस प्रशासन देखील सजग झाले आहेत. (वार्ताहर)