शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

श्रीनगरमधील चौकात वंदे मातरमच्या घोषणा देणा-या 'त्या' महिलेला सुरेश रैनाचा सलाम

By शिवराज यादव | Updated: August 17, 2017 11:38 IST

श्रीनगरमधील लाल चौकात एका महिलेने दहशत झुगारत जाहीरपणे वंदे मातरमच्या घोषणा दिल्या होत्या

मुंबई, दि. 17 - एकीकडे भारता माता की जय बोलायचं की नाही यावरुन वाद-विवाद सुरु असताना श्रीनगरमधील लाल चौकात एका महिलेने दहशत झुगारत जाहीरपणे वंदे मातरमच्या घोषणा दिल्या होत्या. स्वातंत्र्यदिनानिनित्त आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करत धाडस करणा-या या महिलेचं भारतीय क्रिकेटर सुरेश रैनाने कौतुक केलं आहे. सुरेश रैनाने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत या महिलेला सलाम केला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुनीता अरोडा या महिलेने जम्मू-काश्मीरमध्ये लाल चौकात वंदे मातरम, भारतमाता की जय घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

आणखी वाचादहशत झुगारत तिने श्रीनगरमधील लाल चौकात दिल्या वंदे मातरमच्या घोषणाभारतासोबत या देशांचाही असतो स्वातंत्र्य दिनभारताच्या स्वातंत्र्यदिनाला न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगला तिरंग्याचा साजसुरेश रैनाने महिलेने घोषणा दिल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत कौतुक करताना सुनीता अरोडा खूपच धाडसी असून त्यांना माझा सलाम असंही रैनाने लिहिलं आहे. सुनीता अरोडा यांना लाल चौकात पोहोचण्यासाठी 20 चौक्या पार कराव्या लागल्या होत्या. आपण कशासाठी चाललो आहोत यहे उघड होऊ नये यासाठी त्यांनी राष्ट्रीय ध्वज पर्समध्ये लपवून नेला होता. 

देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना काश्मीरमधील श्रीनगर येथे मात्र या दिवशी तणावाचे वातावरण होते. फुटीरतावादी संघटना आणि दहशतवादी यांच्या धमक्यांमुळे येथील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या लाल चौक परिसरात राष्ट्रध्वज फडकावणेही सुरक्षा दलांसमोरील आव्हान ठरते. मात्र ही दहशत झुगारत सुनीता अरोडा यांनी लाल चौकात वंदे मातरम्, भारतमाता की जयच्या घोषणा देत हा परिसर दणाणून सोडला. या महिलेने धैर्य दाखवत केलेल्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

स्वातंत्र्य दिनी होणाऱ्या दहशतावादी कारवाया विचारात घेऊन लष्काराकडून काश्मीरमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येते. त्यात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या श्रीनगरमधील लाल चौक परिसरात तर संचारबंदी लागू केली जाते. मात्र अशा परिस्थितीत सुनीता अरोडा यांनी तेथे वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. तसेच तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनाही अशा घोषणा देण्यासाठी त्या आवाहन करताना व्हिडीओत दिसत आहे. मात्र अघटित होऊ नये म्हणून  सुरक्षा दलांकडून त्या महिलेला तेथून बाहेर काढण्यासाठी धावपळ करावी लागली.  

लाल चौक परिसरामध्ये फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. त्यामुळे येथे नेहमीच तणावाची परिस्थिती असते. येथे 1948 साली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकावला होता. त्यानंतर 1992 साली भाजपाचे तात्कालिन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी येथे तिरंगा फडकवला होता.  

टॅग्स :Suresh Rainaसुरेश रैनाCricketक्रिकेट