कर्जत : विधानसभा मतदार संघात आज विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश लाड यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत आपला नामांकन अर्ज सादर केला. हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन येथील कार्यालयातून हजारो कार्यकर्त्यांसह आमदार सुरेश लाड निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, सिडको संचालक वसंत भोईर, उद्योजक भगवान भोईर, उल्हास देशमुख, रामदास शेंडे, अशोक भोपतराव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष एकनाथ धुळे, विजय पाटील, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सुधाकर घारे, सरपंच भगवान चंचे आदींचा प्रामुख्याने समावेश होता. पोलिसांनी सर्वांना अडवून केवळ पाच जणांना उमेदवार लाड यांच्यासोबत अर्ज भरण्याकरिता सोडले, त्यानंतर उमेदवार सुरेश लाड यांनी आपला नामांकन अर्ज निर्णय अधिकारी राजेंद्र बोरकर यांच्याकडे सादर केला. (वार्ताहर)
कर्जतमध्ये सुरेश लाड यांचे नामांकन
By admin | Updated: September 26, 2014 23:36 IST