शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

सनईचा सुरेल उस्ताद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 03:37 IST

भारतरत्न शहनाईनवाझ उस्ताद बिस्मिल्लाह खाँसाहेब हे नाव जरी ऐकले, तरीही सनईची मंगलधून आपोआप कानांत ऐकू येते

- शैलेश भागवत

भारतरत्न शहनाईनवाझ उस्ताद बिस्मिल्लाह खाँसाहेब हे नाव जरी ऐकले, तरीही सनईची मंगलधून आपोआप कानांत ऐकू येते. या महान कलाकाराचे कार्य पाहता शब्दही थिटे पडतात. शास्त्रीय संगीत सनईसारख्या वाद्यातून ऐकू येणं, हे केवळ शक्य झाले ते खाँसाहेबांमुळे. त्यांची तालीम उस्ताद अली बक्ष या त्यांच्या मामाने करवून घेतली. वाराणसीच्या बालाजी मंदिरात नित्याने १८ तास रोजची तालीम ठरलेली असायची. खाँसाहेब आपल्या साधनेने या वाद्यातून अशी सुरावट घडवू लागले की, पुढे १९४७ साली त्यांच्याच मंगल सनईवादनाने भारताच्या स्वातंत्र्याचादेखील जन्म लाल किल्ल्यावर झाला.सनई हा गिरा हुआ साज होता. म्हणूनच, रस्त्यावर वरातीत वाजणारी सनई जेव्हा खाँसाहेबांनी स्वप्राणाने सुरांनी वाजवली, तेव्हा त्या सनईला एक राजेशाही अस्तित्व निर्माण झाले. सनईला मानाचे स्थान मिळवून देण्यात एकमेव खाँसाहेबांनी आपली हयात खर्च केली. सनईचा सन्मान तर वाढलाच, पण बिस्मिल्लांची सनई संपूर्ण हिंदुस्थानच्या प्रत्येक मंगलकार्याचा एक अविभाज्य घटक बनली. एक तरु ण युवक पुढे सनईचा जनक झाला. सनई म्हणजे फक्त आणि फक्त उस्ताद बिस्मिल्लाह खाँ हे समीकरणच बनून गेले.२१ आॅगस्ट हा खाँसाहेबांचा स्मृती दिन. यंदा त्यांचा बारावा स्मृती दिन आहे. एक तप पूर्ण झाले. मात्र, त्यांच्या महत्तम कार्याचा महिमा, त्यांच्या जादुई सुरांची प्रतिभा आणि त्यांच्या विलक्षण कर्तृत्वाचा पगडा आजदेखील तसाच आहे. शरीराने आज बिस्मिल्लाह खाँसाहेब आपल्यात नसले, तरी आजदेखील सनईच्या सुरावटींच्या माध्यमातून ते आपल्या जीवनाचा एक भाग बनून सदैव सोबत आहेत, हे कायमच सिद्ध होते. मी त्यांना बाबाजान म्हणत असे. त्यांचा सर्वात लाडका शिष्य आणि एकमेव मानसपुत्र म्हणून त्यांनी माझा स्वीकार केला, हा आयुष्यात मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे, असे मी मानतो.सन २००३ मध्ये मुंबईत रंगशारदामध्ये झालेल्या कार्यक्र मात ते उपस्थित होते. शैलेश सनईवादन करणार आहे, हे समजताच आजारी असूनही ते खास विमानाने मुंबईत पोहोचले. माझे गुरू साक्षात माझ्यासमोर बसून माझी सनई ऐकत आहेत, या कल्पनेने मला भरून आले होते. कारण, माझ्या आणि त्यांच्या ४० वर्षांच्या प्रवासात माझे बाबाजान असे कधी कोणत्याच कार्यक्रमाला क्वचितच गेले असतील. भीतीने शहारे येत होते. ३९ वर्षे मी त्यांच्याकडे सनई शिकलो. जरासुद्धा चूक झाली, तरी मला जे हातात येईल, ते घेऊन ते मार देत. इथे तर कार्यक्रमात चूक झाली, तर काय होईल, या भीतीने मी निम्मा झालो होतो. मात्र, जिथे गुरू तिथे शिष्यास मरण ते काय? खाँसाहेबांनी माझी सनई ऐकली. माझं वादन पूर्ण होताच, ते पहिल्या रांगेतून ओरडले... हटो मत... जिस जगह पे बैठे हो, लग जाओ उसमे आगे... और दो साल तगडा जाओ यार, तो तू बिस्मिल्लाह खाँ दुसरा बन जायेगा... त्यांचे हे शब्द म्हणजे माझ्या बाबाजान यांनी मला आयुष्यातला दिलेला सर्वात मोठा पुरस्कार होय.माझ्या डोळ्यांतल्या पाण्यात त्यांची ती समाधानी हास्यमुद्रा असणारी प्रतिमा भरून राहिली होती. या घटनेचे स्मरण होताना ४० वर्षांच्या गुरूशिष्य परंपरेचे आणि पितापुत्र नात्याचे मला मोठे समाधान वाटते.मी स्वत:ला मोठा कलाकार मानत नाही. मात्र आज लोक मला बिस्मिल्लाह खाँ साहेबांचा शिष्य आणि मोठा सनईवादक म्हणूनच ओळखतात. खाँ साहेब आणि रसिकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि आयुष्यभर पुरेल इतके प्रेम दिले. खाँसाहेबांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने असंख्य आठवणी डोळ्यासमोर तरळतात. प्रत्येकाला हे शरीर कधीना कधी सोडून जावे लागते. मात्र, भविष्याची गरज ओळखून माझ्या गुरूंनी दुसऱ्या बिस्मिल्लाहला जन्म दिला होता. माझ्यावर नवी जबाबदारी येऊन पडली आणि ती मी आजदेखील निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करतो आहे.खाँसाहेब मुळातच कडक शिस्तीचे होते. वेळ ते अतिशय काटेकोरपणे पाळत असत. ते अतिशय व्यासंगी कलाकार होते. त्यांना त्यांचा हिंदुस्थान देश, त्यांच्या लाडक्या गंगेच्या तीरावर वसलेले बनारस आणि त्यांची सोबतीण सनई या तीन गोष्टी अतिशय आवडत असत.त्यांना लहर आली की, ते कुठेही, अगदी कुठेही मला बंदिश शिकवत. रागाच्या तपशिलासह त्याची मांडणी किंवा सादरीकरणाच्या पद्धती सांगत असत आणि मला लक्षपूर्वकच ऐकावे लागे. कारण, एकदोन वेळा सांगितलेली गोष्ट पुन्हा विचारण्याची माझ्यात हिम्मत नव्हती. तसे काही झाले, तर गुरूच्या शिक्षेचा धनी व्हावे लागे. मध्येच ते सनई काढून जे शिकवलेले असे ते वाजवून दाखव, असे सांगत. त्यांना वाजवून दाखवल्यावर त्यांची प्रतिक्रि या मला महत्त्वाची असे. कारण, चुकले तर मार आणि प्रसंगी कडवट शब्द, पण जर उत्तम वाजवले तर मात्र ते सर्वांना सांगत राहायचे आणि खूप खाऊपिऊ घालायचे. एका बंद खोलीत ते मला सलग सातआठ तास शिकवायचे. मला कंटाळा आला असे वाटले, तर फिरवून आणायचे. माझ्याकडे पैसे नाहीत असे वाटले, तर मला येण्याजाण्यासाठी, घरखर्चासाठी किंवा खाण्यापिण्यासाठी पैसे द्यायचे. माझ्या बाबाजानने त्यांच्या मुलापेक्षा माझे अधिक लाड केले, असे मी म्हटले तरी चूक ठरणार नाही. त्यांचे नमाजपठण झाले की, ते माझी दृष्ट काढत असत. शिक्षणाचा एक टप्पा पूर्ण झाला की, ते गठबंधन करताना एक गाठ अधिक मारत आणि आनंदाने भरवत. त्यांना मला भरवताना काय आनंद वाटायचा, हे त्यांनाच ठाऊक. परंतु त्यांनी माझ्या मुलीचे (शिरीनचे) देखील अपार लाड केले. ते माझ्या घरी आले, तेव्हा जणू देवाचे पाय घराला लागावे, असे ते क्षण होते. खास बनारसहून ठाण्याला त्यांनी माझ्या घरी यावं, यासारखे भाग्य ते काय असणार?ते गेल्यानंतर १२ वर्षे उलटली, मात्र त्यांच्या अस्तित्वाचा असणारा विलक्षण प्रभाव पाहिला की, ते नाहीत, हे मन मानत नाही. त्यांनी गुरू म्हणून किंवा एक मानसपिता म्हणून जेजे केले, ते ते मोजणे मला शक्य नाही. मात्र, त्यांचे सनईच्याबाबतीले शिक्षण, संस्कार मी कधीही मातीमोल होऊ देणार नाही आणि त्यांच्या आदर्शांचे अवमूल्यन होऊ देणार नाही.शब्दांकन - शुभंकर करंडे