शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

Supriya Sule: 'गरिबांनी जगायचं कसं? तेल 61 तर डाळीची किंमत 54 टक्क्यांनी वाढलीय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 22:11 IST

Supriya Sule: लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान बोलताना देशांतर्गत वाढलेली महागाई आणि त्याचा सर्वसामान्य जनतेवर झालेल्या दुष्परिणामाचा मुद्दा सुप्रिया सुळेंनी मांडला.

नवी दिल्ली - रशिया-युक्रेन युध्दामुळे पेट्रोल, डिझेल यांच्या किमती वाढतील, अशी चर्चा आहे. केंद्र सरकारने मंत्र्यांची एक समिती तयार केली आहे. जनतेच्या हिताचा विचार करून महागाई न वाढविण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करेल,’ असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, देशात अगोदरच महागाई वाढली असून 2018 ते 2021 या काळात प्रचंड महागाई वाढली असून गरिबांनी जगायचं कसं? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत उपस्थित केला आहे.

लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान बोलताना देशांतर्गत वाढलेली महागाई आणि त्याचा सर्वसामान्य जनतेवर झालेल्या दुष्परिणामाचा मुद्दा सुप्रिया सुळेंनी मांडला. वाणिज्य मंत्रालयानुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये 39 घाऊक किंमत निर्देशांक गेल्या वर्षीच्या तुलनेत १४.२३ टक्क्यांनी वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, रशिया-युक्रेनमधील युद्धाचाही परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असून देशातील जनतेलाही त्याचा फटका बसत आहेत. सध्या महागाई प्रचंड वाढली असून ही महागाई कमी करण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.  गोडतेल 67 टक्क्यांनी, पामतेल 61 टक्क्यांनी वाढलंय, मूगडाळ 45, उडीदाची डाळ 54 आणि तूर डाळ 49 टक्क्यांनी महाग झालीय. आता, देशातील गरिबांनी जगायचं कसं? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत उपस्थित केला. देशातील बहुतांश राज्य आर्थिक बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत, त्यातच जीएसटीचा पैसाही राज्यांना वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे, राज्य सरकारला मदत करा, देशातील वाढलेली महागाई कमी करा, वस्तूंच्या किंमती कमी करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केली. 

जीएसटी पैशाबाबत काय म्हणाले कराड

केंद्राकडून राज्याला जीएसटीचे साडेसव्वीस हजार कोटी मिळालेले नाहीत, याकडे लक्ष वेधले असता ‘जीएसटी काऊन्सिलमध्ये ठरल्याप्रमाणे एक ते दीड महिन्यात पैसे मिळतील,’ असे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने यावर्षी ३९ लाख ४५ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. मागील वर्षीचा अर्थसंकल्प ३४ लाख ५० हजार कोटी रुपयांचा होता. यंदाच्या अर्थसंकल्पात ५ लाख रुपयांची वाढ झाली. रोजगार, तंत्रज्ञान, प्रधानमंत्री गतिशक्ती योजना, वाहतूक, जलजीवन योजना आदींसाठी भरघोस तरतूद केली आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेMumbaiमुंबईInflationमहागाईlok sabhaलोकसभा