नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयानं रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची याचिका दाखल करून घेतली असून, तिच्यावर सुनावणी केली आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं भूकबळीवरून राज्यांना फटकारलं. देशात एक समान शासन पाहिजे आणि जेवण मिळवण्यासाठी कोणीही हतबल होता कामा नये. सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यांकडून फूड सिक्युरिटी ऍक्टसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर माहिती मागवली आहे.तक्रार निवारण अधिकारी सर्व राज्यांत उपस्थित आहेत का, असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात चार आठवड्यानंतर पुढील सुनावणी करणार आहे.
गरिबांना 'सर्वोच्च' आधार; रेशन न देण्यावरून न्यायालयाची राज्यांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 16:29 IST